शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Reliance Jio ला पछाडलं; Airtel ठरलं देशातील पहिलं 5G रेडी नेटवर्क

By जयदीप दाभोळकर | Published: January 28, 2021 3:53 PM

'या' शहरात सेवा केली लाईव्ह

ठळक मुद्दे4G स्पेक्ट्रमच्या मदतीनं 5G सेवांना केली सुरूवातद्यमान लिबरलाइज्ड स्पेक्ट्रमद्वारे ही सेवा लाईव्ह

देशात 5G सेवा सुरू करण्याच्या बाबतीत एअरटेलनंरिलायन्स जिओला पछाडलं आहे. भारती एअरटेलनं एका कमर्शिअल नेटवर्कवर लाईव्ह 5G ची यशस्वी चाचणी केली. अशी चाचणी करणारी एअरटेल ही पहिली कंपनी ठरली आहे. एअरटेलने 1800 मेगाहर्ट्झ बँडमध्ये एनएसए (नॉन स्टँड अलोन) नेटवर्क तंत्रज्ञानाद्वारे विद्यमान लिबरलाइज्ड स्पेक्ट्रमद्वारे ही सेवा लाईव्ह केली. आपल्याच प्रकारच्या डायनॅमिक स्पेक्ट्रम शेअरिंगचा वापर करत एअरटेलनं त्याच स्पेक्ट्रम ब्लॉकमध्ये 5G आणि 4G ची सेवा एकत्रितरित्या सुरू केली. दरम्यान, 5G सेवा रेडिओ, कोअर आणि ट्रान्सपोर्ट या सर्व डोमेनसाठी कम्पॅटिबल असेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. एरटेलनं हैदराबादमध्ये कमर्शिअली 5G सेवा लाईव्ह केली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाल विट्टल यांनी Airtel 5G रेडी नेटवर्कची घोषणा केली. 5G स्पेक्ट्रम अलॉटमेंटनंतर ट्रू 5G सेवा सुरू केली जाऊ शकते. तसंच कंपनीकडे 5G रेडी इकोसिस्टम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कमर्शिअलची चाचणी करणारं आपलं पहिलं नेटवर्क आहे, असा दावा एअरटेलनं केला आहे. कंपनीची 5G ची सेवा ही 4G च्या तुलनेत १० टक्के अधिक वेगवान असणार आहे. कंपनीनं याची हैदराबादमध्ये चाचणी घेतली असून पूर्ण मुव्ही अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड केली जाऊ शकते असा दावा कंपनीनं केला आहे. तसंच 5G सेवेमध्ये 3Gbps पर्यंतचा स्पीड मिळू शकतो. कंपनी स्पेक्ट्रमच्या लिलावांतर 5G सेवा त्वरित सुरू करण्याची शक्यता आहे. हैदराबादमधील माधवपूर येथे कंपनी आपल्या 5G सेवेचा डेमोही देत आहे. युझरना या ठिकाणी ही सेवा किती वेगवान आहे हे पाहता येणार आहे.

टॅग्स :AirtelएअरटेलReliance Jioरिलायन्स जिओIndiaभारतhyderabad-pcहैदराबाद