Airtel चा ८४ दिवसांसाठी सर्वात स्वस्त प्लॅन, BSNL-Vi चे वाढले टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 15:18 IST2025-02-14T15:18:07+5:302025-02-14T15:18:28+5:30

Airtel Cheapest Plan : एअरटेलने आपल्या युजर्ससाठी ८४ दिवसांचा स्वस्त प्लॅन आणला आहे. द

airtel 84 days cheapest plan with unlimited free calling | Airtel चा ८४ दिवसांसाठी सर्वात स्वस्त प्लॅन, BSNL-Vi चे वाढले टेन्शन

Airtel चा ८४ दिवसांसाठी सर्वात स्वस्त प्लॅन, BSNL-Vi चे वाढले टेन्शन

Airtel Cheapest Plan :  नवी दिल्ली : एअरटेल ही देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशभरातील जवळपास ३८ कोटी युजर्स एअरटेलची सर्व्हिस वापरतात. गेल्या वर्षी कंपनीने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी एअरटेलने एक असा प्लॅन लाँच केला, ज्यामुळे इतर टेलिकॉम कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे. 

एअरटेलने आपल्या युजर्ससाठी ८४ दिवसांचा स्वस्त प्लॅन आणला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) टेलिकॉम कंपन्यांना स्वस्त व्हॉइस-ओन्ली प्लॅन (Cheapest Calling Plans) लाँच करण्याचे निर्देश दिले होते. याअंतर्गत, एअरटेलने अलीकडेच आपल्या पोर्टफोलिओमध्ये ८४ दिवसांचा एक शानदार प्लॅन आणला आहे. एअरटेलने या प्लॅनमुळे सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल आणि व्होडाफोन-आयडियाची झोप उडवली आहे.

Airtel चा ८४ दिवसांचा स्वस्त प्लॅन
जर तुम्ही एअरटेल सिम वापरत असाल आणि तुम्हाला कॉलिंगसाठी स्वस्त आणि परवडणारा प्लॅन हवा असेल तर हा शानदार प्लॅन आहे. एअरटेलच्या ४६९ रुपयांच्या या प्लॅनने कोट्यवधी युजर्सची मोठी समस्या सोडवली आहे. या स्वस्त प्लॅनमध्ये, कंपनी ग्राहकांना ८४ दिवसांची व्हॅलिडिटीची सुविधा देत आहे.

फ्री कॉलिंगसह स्वस्त रिचार्ज प्लॅन
कंपनीच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांसाठी सर्व लोकल आणि एसटीडी नेटवर्कसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंगची ऑफर दिली जाते. एअरटेल संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी आपल्या युजर्सना एकूण ९०० फ्री एसएमएस देखील देत आहे. एअरटेलचा हा प्लॅन स्पॅम फायटिंग प्रोटेक्शनसह येतो. यासोबतच, तुम्हाला फ्री हॅलोट्यून्सची सर्व्हिस देखील मिळते. याचबरोबर, जर तुम्ही एअरटेल युजर्स असाल ज्यांना जास्त इंटरनेटची आवश्यकता नाही, तर हा स्वस्त रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी खूप किफायतशीर ठरू शकतो.

Web Title: airtel 84 days cheapest plan with unlimited free calling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.