स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 15:02 IST2026-04-09T15:01:34+5:302026-04-09T15:02:07+5:30

AI Plus Nova Series India Price : AI Plus ही कंपनी आता भारतीय मार्केटमध्ये बजेट सेगमेंटमध्ये प्रीमियम फीचर्स देऊन इतर ब्रँड्सना मोठी टक्कर देत आहे.

AI Plus Nova Series India Price: This company's explosion in the world of smartphones! Earbuds for Rs 699, flip phone for Rs 30,000 | स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...

स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...

भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी AI Plus ने आपली बहुप्रतिक्षित Nova Series अधिकृतपणे लाँच केली आहे. या सिरीजमध्ये 'Nova 2', 'Nova 2 Ultra' आणि कंपनीचा पहिला बजेट फोल्डेबल फोन 'Nova Flip' यांचा समावेश आहे. हे सर्व फोन्स कंपनीच्या नवीन NXT Quantum OS वर चालतात, जो विशेषतः AI फीचर्ससाठी डिझाइन केला आहे.

Nova 2 Ultra: बजेटमध्ये फ्लॅगशिप अनुभव
ह्या फोनमध्ये ६.७८ इंचाचा १.५ के अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला असून तो १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात ६००० mAh ची मोठी बॅटरी आणि ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा (Sony IMX752 सेन्सर) आहे. गेमिंगसाठी यात खास ट्रिगर्स आणि 'NxtHalo' लायटिंग इफेक्ट्स देण्यात आले आहेत.

Nova Flip: सर्वांत स्वस्त फोल्डेबल फोन?
AI Plus ने आपला पहिला फ्लिप फोन लाँच करून सॅमसंग आणि मोटोरोला टक्कर दिली आहे. केवळ ₹२९,९९९ च्या किमतीत लाँच झालेला हा फोन सध्याचा सर्वांत परवडणारा फोल्डेबल फोन ठरू शकतो. यात ३.१ इंचाचा मोठा कव्हर डिस्प्ले दिला आहे. 

  • डिस्प्ले: ६.९ इंचाचा मुख्य AMOLED डिस्प्ले आणि ३.१ इंचाचा कव्हर डिस्प्ले.

  • प्रोसेसर: Dimensity ७४०० चिपसेट.

  • कॅमेरा: ५० MP + १२ MP ड्यूअल रिअर कॅमेरा.

मॉडेलप्रमुख फिचर्सकिंमत (अंदाजे सुरुवातीची)
Nova 2 5GUnisoc T8200, 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा₹८,९९९
Nova 2 UltraDimensity 7400, 1.5K AMOLED, 144Hz₹१४,९९९
Nova Flip 5G6.9" Inner AMOLED, 3.1" Cover Display₹२९,९९९

NXT Quantum OS चा करिष्मा:
हे सर्व फोन्स अँड्रॉइड १६ वर आधारित 'NxtQ OS' वर चालतात. यात प्रगत AI शॉर्टकट, गेमिंग कस्टमायझेशन आणि बॅटरी ऑप्टिमायझेशनसाठी खास अल्गोरिदम वापरले आहेत.

Web Title : एआई प्लस ने किफायती ईयरबड्स, फोल्डेबल फोन से स्मार्टफोन बाजार में मचाया तहलका

Web Summary : एआई प्लस ने नोवा सीरीज़ लॉन्च की, जिसमें ₹29,999 में नोवा फ्लिप फोल्डेबल फोन शामिल है। यह सीरीज़ एआई फीचर्स के साथ NXT क्वांटम ओएस पर चलती है और बजट-अनुकूल फ्लैगशिप अनुभव प्रदान करती है।

Web Title : AI Plus Disrupts Smartphone Market with Budget Earbuds, Foldable Phone

Web Summary : AI Plus launched its Nova series, including the Nova Flip foldable phone at ₹29,999. The series runs on NXT Quantum OS with AI features and offers budget-friendly flagship experiences.