बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:02 IST2025-12-31T13:01:11+5:302025-12-31T13:02:48+5:30
AI Job Risk 2026 : मायक्रोसॉफ्टने केवळ धोक्याचा इशारा दिलेला नाही, तर मार्गही सुचवला आहे. कोणती क्षेत्रे या एआयच्या कचाट्यातून सुटणार...

बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
सध्या येणारे २०२६ वर्ष कसे जाणार, यावरून बाबा वेंगा, नास्त्रेदेमस सारख्या भविष्यवेत्त्यांच्या भाकितांना जास्त भाव दिला जात आहे. परंतू, या सगळ्यात करोडो लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आणणाऱ्या भस्मासुराकडे दुर्लक्ष होत आहे. आपल्या सॉफ्टवेअरद्वारे अब्जावधी लोकांना नोकऱ्या मिळवून देणाऱ्या मायक्रोसॉफ्टने येणाऱ्या २०२६ या सालासाठी मोठी भयानक भविष्यवाणी केली आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या प्रभावामुळे जगभरातील नोकरीच्या बाजारपेठेत मोठी खळबळ माजली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने नुकताच एक खळबळजनक अहवाल प्रसिद्ध केला असून, यामध्ये २०२६ पर्यंत एआयमुळे धोक्यात येऊ शकणाऱ्या ४० प्रमुख नोकऱ्यांची यादी जाहीर केली आहे.
मायक्रोसॉफ्टच्या अहवालानुसार, ज्या कामांमध्ये पुनरावृत्ती आणि डेटा प्रोसेसिंगचा जास्त समावेश आहे, अशा नोकऱ्यांवर एआयचा सर्वाधिक परिणाम होईल. यामध्ये खालील क्षेत्रांचा प्रामुख्याने समावेश आहे:
इतिहासकार (इतिहासकार)
इंटरप्रेटर आणि ट्रान्सलेटर
सेल्स रिप्रेजेंटिव्ह
पैसेंजर अटेंड
CNC टूल प्रोग्रामर
लेखक आणि लेखक
कस्टमर सर्व्हिस रिप्रेजेंट शिव
टिकट एजंट आणि ट्रॅव्हल क्लर्क
टेलीफोन ऑपरेटर
ब्रॉडकास्ट अनाउन्सर आणि रेडियो जॉकी
कोणाला घाबरण्याचे कारण नाही?
अहवालात असेही नमूद केले आहे की, ज्या नोकऱ्यांमध्ये मानवी संवेदना, सर्जनशीलता आणि धोरणात्मक निर्णय आवश्यक आहेत, त्या नोकऱ्या अधिक सुरक्षित आहेत. डॉक्टर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि उच्चस्तरीय व्यवस्थापन या क्षेत्रांवर एआयचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.
बदलत्या काळात 'अपस्किलिंग' हाच पर्याय
मायक्रोसॉफ्टने केवळ धोक्याचा इशारा दिलेला नाही, तर मार्गही सुचवला आहे. २०२६ पर्यंत कामगारांना 'एआय स्किल्स' आत्मसात करणे अनिवार्य असेल. जे लोक एआयला आपला शत्रू न मानता त्याला एक 'टूल' म्हणून वापरायला शिकतील, त्यांच्या नोकऱ्या अधिक सुरक्षित राहतील आणि त्यांचा पगारही वाढू शकेल. एआयमुळे नवीन प्रकारच्या नोकऱ्याही निर्माण होतील, ज्याचे स्वरूप आजच्यापेक्षा वेगळे असेल. नवनिर्मिती आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग यांसारख्या कौशल्यांना मोठी मागणी येईल.