शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

Xiaomi चं Apple च्या पावलावर पाऊल; स्वस्त फोनमध्ये चार्जर नाही?, उद्या होणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 7:59 PM

Redmi Note 11SE Launch: Apple त्यांच्या फोनसह बॉक्समध्ये चार्जर देत नाही. आता Xiaomi देखील तेच करणार आहे. कंपनी उद्या एक नवीन बजेट फोन Redmi Note 11SE लाँच करत आहे.

Redmi Note 11SE Launch: स्मार्टफोन इंडस्ट्रीत मग ते डिव्हाईसचे डिझाईन असो किंवा एखाद्या कंपनीची पॉलिसी, अनेक गोष्टी फॉलो केल्या जातात. यापूर्वी एका कंपनीनं स्मार्टफोनच्या बॉक्समधून इयरफोन्स गायब केले. त्यानंतर अनेक कंपन्यांनी तोच मार्ग अवलंबला. Apple ने प्रथम 3.5mm ऑडिओ जॅक काढला, नंतर बॉक्समधून चार्जर काढून टाकला. आता अनेक कंपन्यांनी तेच करायला सुरुवात केली आहे.

सॅमसंगच्या अनेक बॉक्समध्ये तुम्हाला चार्जर मिळत नाही. अलीकडे, Realme ने देखील त्यांचा स्वस्त फोन Narzo 50A Prime च्या बॉक्समध्ये चार्जर दिला नव्हता आणि आता Xiaomi देखील तेच करण्याच्या तयारीत आहे. Redmi च्या आगामी फोन Redmi Note 11SE सह बॉक्समध्ये चार्जर उपलब्ध होणार नाही. कंपनीची वेबसाइटवरून तरी असंच दिसत आहे. Redmi Note 11SE भारतात 26 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार आहे. कंपनीच्या Note 11 सीरिजमधील हा नवा मोबाईल असेल.

बॉक्समध्ये काय?अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, Redmi Note 11SE सह बॉक्समध्ये चार्जर उपलब्ध होणार नाही. यामध्ये तुम्हाला फक्त फोन, चार्जिंग केबल, केस, सिम इजेक्टर टूल, क्विक गाइड आणि वॉरंटी कार्ड मिळेल. म्हणजेच, तुम्हाला बॉक्समध्ये चार्जिंग अडॅप्टर मिळणार नाही.

काय आहेत स्पेसिफिकेशन?Redmi च्या या मोबाईलमध्ये 6.43-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले मिळेल, जो 60Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. हँडसेटमध्ये MediaTek Helio G95 प्रोसेसरही मिळेल. याशिवाय फोनमध्ये 6GB रॅम आणि 8GB रॅमचा पर्याय मिळेल. तसेच यामध्ये 64GB आणि 128GB स्टोरेजचा पर्याय मिळेल. हा फोन Android 11 बेस्ड MIUI 12.5 सह लाँच केला जाऊ शकतो. यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल, यातील मेन कॅमेरा 64MP चा असेल. याशिवाय फ्रन्ट कॅमेरा 13MP चा असेल. तसंच यात 5000mAh ची बॅटरी मिळणार असून यात 33W चं फास्ट चार्जिंग सपोर्टही देण्यात येणार आहे.

टॅग्स :xiaomiशाओमीApple Incअॅपल