जानेवारीपासून 'या' मोबाइलवर WhatsApp होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 03:46 PM2018-12-22T15:46:13+5:302018-12-22T15:59:34+5:30

WhatsApp ने आणलेल्या नव्या फीचरमुळे 31 डिसेंबरनंतर म्हणजेच जानेवारीपासून काही मोबाइलवर WhatsApp बंद होणार आहे. 31 डिसेंबर नंतर WhatsApp काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणं बंद करणार आहे.

after 31 december 2018 whatsapp will not support this operating system | जानेवारीपासून 'या' मोबाइलवर WhatsApp होणार बंद

जानेवारीपासून 'या' मोबाइलवर WhatsApp होणार बंद

Next
ठळक मुद्देWhatsApp ने आणलेल्या नव्या फीचरमुळे 31 डिसेंबरनंतर काही मोबाइलवर WhatsApp बंद होणार आहे. 31 डिसेंबरनंतर WhatsApp काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणं बंद करणार आहे.Android 2.3.7 आणि जुन्या व्हर्जनसोबत iPhone iOS7 वर 1 फेब्रुवारी 2020 नंतर WhatsApp चालणार नाही.

नवी दिल्ली - WhatsApp हे सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. आपल्या युजर्ससाठी WhatsApp नेहमीच नवनवीन फीचर्स आणत असतं. मात्र यावेळी WhatsApp ने आणलेल्या नव्या फीचरमुळे 31 डिसेंबरनंतर म्हणजेच जानेवारीपासून काही मोबाइलवर WhatsApp बंद होणार आहे. 31 डिसेंबरनंतर WhatsApp काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणं बंद करणार आहे. त्यामुळे त्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp चालणार नाही.

नोकियाच्या जुन्या ऑपरेटिंग सिस्टमचे युजर्स WhatsApp चा वापर करू शकणार नाही. Nokia S40 या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या फोनमध्ये 31 डिसेंबरनंतर WhatsApp चालणार नाही. WhatsApp या प्लॅटफॉर्मसाठी फीचर विकसित करणार नसल्याने या स्मार्टफोनमध्ये ते चालणार नाही. तसेच Nokia S40 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या अनेक स्मार्टफोनमधील काही फीचर्स हे कधीही बंद होऊ शकतात. 

WhatsApp मधील 'या' सेटिंग्स बदला अन् प्रायव्हसीची चिंता विसरा

WhatsApp चॅटिंगची गंमत आणखी वाढणार; 'हे' खास फीचर्स लवकरच लाँच होणार

Android 2.3.7 आणि जुन्या व्हर्जनसोबत iPhone iOS7 वर 1 फेब्रुवारी 2020 नंतर WhatsApp चालणार नाही. WhatsApp ने यासंबंधी माहिती दिली आहे. तसेच काही फीचर्स कोणत्याही क्षणी बंद होतील, असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याआधी WhatsApp ने घेतलेल्या निर्णयानंतर Windows Phone 8.0, ब्लॅकबेरी OS आणि ब्लॅकबेरी 10 या मोबाइलमधील WhatsApp 31 डिसेंबर 2017 नंतर बंद झाले होते. 

Web Title: after 31 december 2018 whatsapp will not support this operating system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.