WhatsApp मधील 'या' सेटिंग्स बदला अन् प्रायव्हसीची चिंता विसरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 03:08 PM2018-12-20T15:08:02+5:302018-12-20T16:04:15+5:30

मेसेज, फोटो, व्हिडीओ, डॉक्यूमेंट्स पाठवण्यासाठी WhatsApp चा वापर केला जातो. मात्र संवाद साधत असताना युजर्सना त्यांच्या प्रायव्हसीची चिंता सतावत असते.

these whatsapp settings will end privacy concern | WhatsApp मधील 'या' सेटिंग्स बदला अन् प्रायव्हसीची चिंता विसरा

WhatsApp मधील 'या' सेटिंग्स बदला अन् प्रायव्हसीची चिंता विसरा

googlenewsNext
ठळक मुद्देमेसेज, फोटो, व्हिडीओ, डॉक्यूमेंट्स पाठवण्यासाठी WhatsApp चा वापर केला जातो. संवाद साधत असताना युजर्सना त्यांच्या प्रायव्हसीची चिंता सतावत असते. WhatsApp मधील काही सेटिंग्स बदलून आपल्या पर्सनल गोष्टी सेफ ठेवणे शक्य आहे.

नवी दिल्ली - WhatsApp संवाद साधण्याचं लोकप्रिय माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर केला जातो. मेसेज, फोटो, व्हिडीओ, डॉक्यूमेंट्स पाठवण्यासाठी WhatsApp चा वापर केला जातो. मात्र संवाद साधत असताना युजर्सना त्यांच्या प्रायव्हसीची चिंता सतावत असते. पण आता काळजी करण्याचं काही कारण नाही कारण WhatsApp मधील काही सेटिंग्स बदलून आपल्या पर्सनल गोष्टी सेफ ठेवणे शक्य आहे. या सेटिंग्सबाबत जाणून घेऊया.  

लास्ट सीन

WhatsApp वर आपण दुसऱ्या व्यक्तीचा लास्ट सीन पाहू शकतो. तसेच आपलाही लास्ट सीन इतरांना दिसतो. त्यामुळे तुम्ही कधीपर्यंत WhatsApp वर अॅक्टीव्ह आहात याची माहिती इतरांना मिळते. त्यामुळे सेटींगमध्ये जाऊन तुम्ही काही बदल करू शकता. सेटींगमध्ये Everybody च्या जागी Nobody करा म्हणजे तुमचा लास्ट सीन इतरांना दिसणार नाही.

प्रोफाईल फोटो

WhatsApp वर असलेला प्रोफाईल फोटो अनेकदा दुसरी व्यक्ती सेव्ह करू शकतो. मात्र तुम्हाला तुमचा फोटो शेअर किंवा डाऊनलोड करू नये असं वाटत असेल तर फोटोची व्हिजिबिलीटी तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंतच मर्यादीत ठेवा.

मेसेज प्रिव्ह्यू

WhatsApp वर येणाऱ्या सर्व मेसेजचा सर्वात आधी एक स्मॉल प्रिव्ह्यू दिसतो. मात्र तुम्हाला तो प्रिव्ह्यू नको असेल तर नोटीफिकेशन सेटिंग्समध्ये जाऊन Show Preview हा पर्याय बंद करा म्हणजे मेसेज प्रिव्ह्यू दिसणार नाही. 

WhatsApp  स्टेटस

एखादा व्हिडीओ, फोटो किंवा काही टेक्स्ट मेसेज WhatsApp  स्टेटसवर ठेवले जातात. 24 तास हे स्टेटस दिसत राहतं. मात्र तुम्हाला ते स्टेटस काही मोजक्याच मंडळींना दाखवायचं असल्यास तुम्ही स्टेट्स प्रायव्हसीमध्ये जाऊन Only Share With या पर्यायावर क्लिक करा. 

रीड रिसीट

एखाद्या व्यक्तीने पाठवलेला मेसेज आपण पाहिला की नाही हे समोरच्या व्यक्तीला प्रामुख्याने ब्ल्यू टीक पाहिल्यानंतर कळतं. मात्र तुम्ही मेसेज वाचला हे कळू नये असं वाटत असेल तर रीड रिसीट टर्न ऑफ करा. असे केल्यास समोरच्या व्यक्तीला मेसेजला ब्ल्यू टीक दिसणार नाही. 

Web Title: these whatsapp settings will end privacy concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.