होळी जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशा उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. पावसाळा, हिवाळ्यात बंद केलेले एसी आता पुन्हा सुरु होणार आहेत. या एसीची सर्व्हिसिंग करून घेण्यास आता सुरुवात झाली आहे. अशावेळी जेट सर्व्हिस आणि नॉर्मल सर्व्हिस असे पर्याय निवडले जातात. तुमच्यासाठी काय गरजेचे आहे, हे तुम्हाला आज जाणून घ्यायचे आहे.'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
जेट सर्व्हिसमध्ये हाय-प्रेशर वॉटर पंपचा वापर केला जातो. यामध्ये प्रेशर गनच्या साहाय्याने कूलिंग कॉइल्स, फिन्स आणि ब्लोअरमधील चिकटलेला घाण आणि चिखल साफ केला जातो. ही सर्व्हिस केव्हा करावी, तर जेव्हा एसी दीर्घकाळ बंद असतो किंवा तुमचा एसी दिवसातून १५-१८ तास चालत असेल, तर जेट सर्व्हिस करणे फायदेशीर ठरते. ही सर्व्हिस थोडी महाग असते. परंतू, फिन्स स्वच्छ झाल्याने एसीची कूलिंग क्षमता वाढते, कॉम्प्रेसरवरचा ताण कमी होतो आणि विजेचे बिलही कमी येते.
नॉर्मल सर्व्हिस केव्हा करावी...तशी नॉर्मल सर्व्हिस देखील काही आता स्वस्त राहिलेली नाही. जेट सर्व्हिस ७०० रुपयांना असेल तर ही साधी सर्व्हिस ५०० रुपयांना जाते. एअर फिल्टर धुतला जातो आण ब्रशने धूळ साफ केली जाते. स्प्रे बॉटलने पाणी फवारले जाते. एसीचा कमी वापर असेल आणि मागची सर्व्हिस जेट केली असेल तर मधली सर्व्हिस ही साधी करावी. कारण एसी एवढा खराब झालेला नसतो. परंतू, जर तुम्ही धुळीच्या परिसरात राहत असाल तर मात्र तुम्हाला जेट सर्व्हिसच करावी लागेल. नॉर्मल सर्व्हिस हीस्वस्त असते आणि यात पाण्याचा वापर कमी असल्याने सेन्सर्स किंवा पीसीबी मध्ये पाणी जाण्याचा धोका नसतो. एसी वरवर साफ होतो, पण कॉइल्सच्या आत साचलेली खोलवरची घाण निघत नाही.
Web Summary : Choose between jet and normal AC service based on usage and environment. Jet service is ideal for heavy use or dusty areas, offering better cooling but costing more. Normal service suffices for light use, being cheaper but less thorough.
Web Summary : उपयोग और वातावरण के आधार पर जेट और नॉर्मल AC सर्विस चुनें। जेट सर्विस भारी उपयोग या धूल वाले क्षेत्रों के लिए आदर्श है, बेहतर कूलिंग प्रदान करती है लेकिन इसकी लागत अधिक होती है। नॉर्मल सर्विस कम उपयोग के लिए पर्याप्त है, जो सस्ती है लेकिन कम प्रभावी है।