२०२५ मध्ये अभिषेक शर्माला सर्वाधिक गुगल सर्च करत राहिले पाकिस्तानी...; आशिया कपमध्ये धुळधाण उडविलेली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 11:23 IST2025-12-10T11:21:55+5:302025-12-10T11:23:32+5:30
Abhishek Sharma Pakistan Search : अभिषेक शर्मा हा २०२५ मधील टॉप ५ सर्वाधिक शोधलेल्या खेळाडूंच्या यादीतील एकमेव गैर-पाकिस्तानी खेळाडू आहे. पाकिस्तानचे आघाडीचे खेळाडू बाबर आझम किंवा शाहीन शाह आफ्रिदी यांनाही त्याने मागे टाकले आहे.

२०२५ मध्ये अभिषेक शर्माला सर्वाधिक गुगल सर्च करत राहिले पाकिस्तानी...; आशिया कपमध्ये धुळधाण उडविलेली...
भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटची कट्टर स्पर्धा जगजाहीर आहे, पण २०२५ या वर्षात Google Search ट्रेंड्सने एक अत्यंत मनोरंजक आणि अनपेक्षित चित्र समोर आणले आहे. Google च्या 'Year in Search 2025' अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये स्थानिक स्टार्सना मागे टाकत, भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा हा 'सर्वाधिक शोधलेला खेळाडू' ठरला आहे.
अभिषेक शर्मा हा २०२५ मधील टॉप ५ सर्वाधिक शोधलेल्या खेळाडूंच्या यादीतील एकमेव गैर-पाकिस्तानी खेळाडू आहे. पाकिस्तानचे आघाडीचे खेळाडू बाबर आझम किंवा शाहीन शाह आफ्रिदी यांनाही त्याने मागे टाकले आहे.
यामागचे मुख्य कारण म्हणजे २०२५ मध्ये झालेला आशिया चषक आहे. अभिषेक शर्माने सुपर फोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध केलेल्या स्फोटक फलंदाजीचा पाकिस्तानात किती मोठा प्रभाव पडला याचे हे पुरावे आहेत. त्याने वेगवान गोलंदाजांवर केलेल्या तुफानी हल्ल्यांमुळे पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झाले आणि परिणामी, त्याला मोठ्या प्रमाणात 'सर्च' केले गेले. प्रथम फलंदाजी करताना, पाकिस्तान क्रिकेट संघाने २० षटकांत ५ बाद १७१ धावा केल्या होत्या. साहिबजादा फरहानच्या ४५ चेंडूत ५८ धावा केल्याने दोन वेळा आशिया कप विजेत्या संघाने भारताविरुद्ध पहिल्या डावात सर्वाधिक धावसंख्या उभारली होती. अभिषेक शर्मा (३९ चेंडूत ७४) आणि शुभमन गिल (२८ चेंडूत ४७) यांनी ५९ चेंडूत १०५ धावांची सलामी भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला होता.
भारत आणि पाकिस्तानमधील ऑपरेशन सिंदूरमुळे आशिया चषक वादातीत राहिला होता. पाकिस्तानसोबतच्या सामन्यांत भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्याने पाकिस्तानची वेळोवेळी फजिती झाली होती. परंतू, फायनल जिंकल्यानंतर भारताने पाकिस्तानी मंत्री मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. नक्वी ती ट्रॉफी घेऊन परत गेले होते. ही आंतरराष्ट्रीय बेईज्जती सर्व जगाने पाहिली होती. पाकिस्तानला फायनलमध्ये जाण्यापासून अभिषेक शर्मानेचे रोखले होते.
टेक्नोलॉजीमध्ये 'Gemini' चा जलवा
खेळाडूंच्या श्रेणीनंतर, तंत्रज्ञान श्रेणीमध्ये पाकिस्तानने मोठ्या प्रमाणावर 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' साधनांचा शोध घेतला. या श्रेणीत गुगलच्या 'जेमिनी' या AI मॉडेलने सर्वाधिक पसंती मिळवली. याव्यतिरिक्त 'आयफोन १७', 'डीपसीक', आणि 'गुगल एआय स्टुडिओ' हेसुद्धा टॉप ट्रेंड्समध्ये होते.
इतर प्रमुख ट्रेंड्स:
क्रिकेट सामने: 'पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका' हा सर्वाधिक सर्च केलेला सामना ठरला.
लोकल न्यूज: पंजाब सोशियो-इकोनॉमिक रजिस्ट्री आणि कराचीतील पूर हे प्रमुख स्थानिक वृत्त विषय होते.