तुमचे Aadhaar आता अधिक सुरक्षित होणार! UIDAI ने सुरू केला SITAA कार्यक्रम; जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 18:09 IST2025-10-20T18:08:24+5:302025-10-20T18:09:11+5:30
UIDAI SITAA: डीपफेक, बायोमेट्रिक फसवणूक आणि डिजिटल आयडेंटिटी सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

तुमचे Aadhaar आता अधिक सुरक्षित होणार! UIDAI ने सुरू केला SITAA कार्यक्रम; जाणून घ्या...
UIDAI SITAA: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) तंत्रज्ञान आधारित महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. SITAA (Scheme for Innovation and Technology Association with Aadhaar) असे या उपक्रमाचे नाव आहे. या कार्यक्रमाचा उद्देश देशातील आधार व्यवस्थेला अधिक सुरक्षित, वेगवान आणि विश्वसनीय बनवणे आहे.
या उपक्रमाअंतर्गत UIDAI स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि उद्योग जगताशी भागीदारी करून आधार प्रणालीमध्ये नवकल्पना आणण्याचे ध्येय ठेवत आहे.
डीपफेक्सवर नियंत्रणासाठी हाय-टेक सिस्टीम
SITAA कार्यक्रमांतर्गत UIDAI AI-आधारित अत्याधुनिक उपाय विकसित करण्यावर भर देत आहे. यात रिअल-टाईम डीपफेक डिटेक्शन, फेस लाइवनेस ओळख (Face Liveness Detection) आणि कॉन्टॅक्टलेस फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन या तंत्रज्ञानांचा समावेश आहे.
UIDAI ने यासाठी नवीन संशोधन आणि इनोव्हेशन प्रस्ताव मागवले असून, त्यासाठीची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
MeitY Startup Hub आणि NASSCOM सह भागीदारी
या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी UIDAI ने MeitY Startup Hub (MSH) आणि NASSCOM यांच्याशी करार केला आहे. MSH स्टार्टअप्सना मेंटॉरशिप, इनक्युबेशन आणि ॲक्सेलरेटर सपोर्ट देईल. NASSCOM उद्योग क्षेत्राशी जोडणी आणि जागतिक सहकार्य वाढवण्याची भूमिका निभावेल.
UIDAI च्या मते, SITAA हा भारताच्या सुरक्षित, आत्मनिर्भर आणि सर्वसमावेशक डिजिटल ओळख प्रणालीकडे वाटचालीचा महत्वाचा टप्पा आहे.
SITAA चे तीन मुख्य तांत्रिक आव्हाने
Face Liveness Detection
स्टार्टअप्सना असे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट (SDK) तयार करण्याचे प्रोत्साहन दिले जात आहे, जे डीपफेक, मास्क किंवा फोटो स्पूफिंग ओळखू शकतील. हे उपाय विविध उपकरणे आणि लोकसंख्या यांच्यात समान कार्यक्षम राहतील, तसेच मोबाइल आणि सर्व्हर स्तरावर सहज चालतील.
Presentation Attack Detection
संशोधन संस्थांना AI आणि मशीन लर्निंग आधारित प्रणाली विकसित करण्याचे आवाहन केले आहे, ज्या प्रिंट, रीप्ले किंवा मॉर्फिंगसारख्या सायबर हल्ल्यांना ओळखू शकतील. या प्रणालींनी गोपनीयता, अचूकता आणि Aadhaar APIs शी सुसंगतता राखणे आवश्यक आहे.
Contactless Fingerprint Authentication
UIDAI अशा तंत्रज्ञानाच्या शोधात आहे, ज्याद्वारे स्मार्टफोन कॅमेरा किंवा कमी किमतीच्या सेन्सर्सच्या सहाय्याने फिंगरप्रिंट ओळख शक्य होईल. ही प्रणाली AFIS-मानक टेम्पलेट्स आणि लाइवनेस डिटेक्शन दोन्हींचे पालन करेल.