शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

'123456' सारखा पासवर्ड 1 सेकंदात होतो क्रॅक; 'हे' आहेत 20 कमकुवत पासवर्ड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 14:08 IST

NordPass च्या रिपोर्टनुसार, जवळपास 20 पासवर्ड असे समोर आले आहेत, जे भारतीय सामान्यतः सर्वात जास्त वापरतात.

देशात सायबर क्राईमच्या (CyberCrime) घटना झपाट्याने वाढत आहेत, अशा परिस्थितीत सतर्क राहणे आणि मजबूत पासवर्ड तयार करणे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त एक स्ट्रॉंग पासवर्ड तुमचे पर्सनल आणि सोशल अकाउंट सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकतो, परंतु पासवर्ड तयार करताना, लोक सहसा इतका सोपा पासवर्ड तयार करतात की, तो क्रॅक करणे हॅकर्ससाठी फक्त 1 सेकंदाचा खेळ आहे.

NordPass च्या रिपोर्टनुसार, जवळपास 20 पासवर्ड असे समोर आले आहेत, जे भारतीय सामान्यतः सर्वात जास्त वापरतात. यासोबतच हे पासवर्ड क्रॅक करण्यासाठी हॅकर्सना किती वेळ लागतो, याचाही रिपोर्टमध्ये उल्लेख आहे. रिपोर्टनुसार, 123456, admin, 12345678, 12345, password, 123456789, 1234567890, administrator, Password असे  काही पासवर्ड आहेत, जे हॅकर्सना क्रॅक करण्यासाठी 1 सेकंद लागतो. 

याचबरोबर, admin123 आणि Password@123 क्रॅक करण्यासाठी 11 सेकंद आणि 2 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो. Pass@123 असा पासवर्ड 5 मिनिटांत क्रॅक होऊ शकतो, तर Welcome@123 हा पासवर्ड 10 मिनिटांत क्रॅक होऊ शकतो. याशिवाय Pass@1234, Abcd@1234, Abcd@123, UNKNOWN सारखे पासवर्ड 17 मिनिटांत क्रॅक होतात. तसेच, रिपोर्टनुसार, admin@123 असा पासवर्ड 34 मिनिटांत, India@123 हा पासवर्ड 3 तासांत आणि Admin@123 असा पासवर्ड 1 वर्षात क्रॅक होऊ शकतो. 

कसा तयार करावा सुरक्षित पासवर्ड?जेव्हाही पासवर्ड बनवला जातो, तेव्हा मनात एकच प्रश्न फिरू लागतो की एक मजबूत पासवर्ड कसा बनवायचा, जो खाते हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. तुमच्या अकाउंटसाठी पासवर्ड तयार करताना फक्त स्मॉल कॅरेक्टरचा (अक्षरे) वापर नाही, तर कॅपिटल कॅरेक्टरचाही वापर करावा. इतकेच नाही तर एक मजबूत पासवर्ड तयार करण्यासाठी सिंबल, नंबर इत्यादी वापरा आणि इतका मजबूत पासवर्ड तयार करा की, हॅकर्स सहजपणे क्रॅक करू शकत नाहीत.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान