९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:05 IST2025-12-30T10:04:44+5:302025-12-30T10:05:04+5:30
आयफोनमध्ये असे काही सीक्रेट फीचर्स दडलेले आहेत, ज्याबद्दल अनेक वर्ष फोन वापरणाऱ्या युजर्सनाही माहिती नसते!

९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
जगभरात आयफोन त्याच्या जबरदस्त कॅमेरा क्वालिटी आणि भक्कम सिक्युरिटीसाठी ओळखला जातो. मात्र, तुमच्या लाडक्या आयफोनमध्ये असे काही सीक्रेट फीचर्स दडलेले आहेत, ज्याबद्दल अनेक वर्ष फोन वापरणाऱ्या युजर्सनाही माहिती नसते. असेच एक भन्नाट फिचर म्हणजे 'बॅक टॅप'. स्क्रीनला स्पर्श न करता किंवा कोणतेही बटण न दाबता केवळ फोनच्या मागच्या बाजूला बोटाने टच करून तुम्ही अनेक कामे करू शकता. विशेष म्हणजे, ९० टक्के लोक या सुविधेचा वापरच करत नाहीत.
काय आहे हे 'बॅक टॅप' सीक्रेट फीचर?
'बॅक टॅप' हे आयफोनमधील एक एक्सेसिबिलिटी फीचर आहे. यामध्ये फोनच्या मागील बाजूला (जिथे ॲपलचा लोगो असतो तिथे) बोटाने दोनदा किंवा तीनदा टॅप केल्यास तुम्ही सेट केलेले काम आपोआप पूर्ण होते. यासाठी आयफोनमधील प्रगत सेन्सरचा वापर केला जातो. त्यामुळे फोनवर कव्हर असले तरीही हे फीचर उत्तम प्रकारे काम करते.
या फीचरचे फायदे काय?
अनेकदा आपल्याला घाईत असताना स्क्रीनशॉट घ्यायचा असतो किंवा फ्लॅशलाईट सुरू करायची असते. अशा वेळी स्क्रीन अनलॉक करून ॲप शोधण्यात वेळ जातो. 'बॅक टॅप'मुळे तुमचे काम सोपे होते.
या सीक्रेट फीचर द्वारे तुम्ही झटपट स्क्रीनशॉट घेणे, कॅमेरा किंवा फ्लॅशलाईट सुरू करणे, कंट्रोल सेंटर किंवा नोटिफिकेशन सेंटर उघडणे, फोन सायलेंट मोडवर टाकणे, ते अगदी सिरीसुद्धा या टॅपिंगद्वारे ॲक्टिव्हेट करता येते.
कसे सुरू करायचे हे फिचर?
तुमच्या आयफोनमध्ये हे फिचर आधीच उपलब्ध आहे, फक्त तुम्हाला ते सुरू करावे लागेल.
१. सर्वात आधी फोनच्या Settings मध्ये जा.
२. तिथे खाली स्क्रोल करून Accessibility या पर्यायावर क्लिक करा.
३. त्यानंतर Touch या बटणावर क्लिक करा.
४. सर्वात शेवटी तुम्हाला Back Tap हा पर्याय दिसेल, तो निवडा.
५. तिथे तुम्ही Double Tap आणि Triple Tap साठी तुमच्या आवडीचे काम सेट करू शकता.
स्मार्ट युजर्ससाठी गेमचेंजर
ज्यांना फोनचा वापर अतिशय वेगाने आणि स्मार्ट पद्धतीने करायचा आहे, त्यांच्यासाठी हे फीचर वरदान ठरत आहे. एकदा ही सेटिंग करून पाहा, तुमचा आयफोन वापरण्याचा अनुभव पूर्णपणे बदलून जाईल.