69 कोटी लोक ‘इंटरनेट गरिबी’तून पडले बाहेर; स्वस्त दरांमुळे साधली किमया, किमती २० टक्क्यांनी घटल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 06:40 IST2023-10-17T06:39:48+5:302023-10-17T06:40:01+5:30
आफ्रिकन देशांच्या इंटरनेट गरिबी निर्देशांकात घट झाली आहे. या गरिबीचा सामना करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे.

69 कोटी लोक ‘इंटरनेट गरिबी’तून पडले बाहेर; स्वस्त दरांमुळे साधली किमया, किमती २० टक्क्यांनी घटल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आजही अनेक जण इंटरनेटपासून दूर आहेत, हे वास्तव आहे. इंटरनेट घेण्यासाठी पैसे मोजण्याची क्षमता नसल्याने हे लोक ‘इंटरनेट गरीब’ही ठरले आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत दर आणखी कमी केल्याने जगभरातील ४० टक्के लोकसंख्येची म्हणजेच ६९ कोटी जणांची ही ‘गरिबी’ दूर झाली आहे. अशा नागरिकांची संख्या आशियाई देशांमध्ये सर्वाधिक होती.
आफ्रिकन देशांच्या इंटरनेट गरिबी निर्देशांकात घट झाली आहे. या गरिबीचा सामना करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे.
इंटरनेटचे दर कमी करण्याची गरज
जगभरातील ‘इंटरनेट गरीब’ या वर्गाची लोकसंख्या कमी व्हावी, यासाठी व्यापक प्रयत्न केले जात आहेत. तसेच इंटरनेटचे दर आणखी कमी करण्याची गरज आहे.
किमती कितीने घटल्या?
२०१५ पासून जगभर इंटरनेटचे सरासरी २४ टक्क्यांनी कमी झाले. यापेक्षा अधिक घट झाल्याने काही देशांमधील अधिक नागरिकांना इंटरनेटचा वापर करणे शक्य झाले.
आफ्रिकेत ५२% कक्षेबाहेर
२०१५ नंतर जगभरात सर्वत्र इंटरनेटच्या किमती कमी होऊ लागल्या. आफ्रिकेत या किमती तुलनेत बऱ्याच घटल्या असल्या तरीही तेथील ५२ टक्के लोकसंख्या आजही इंटरनेटपासून दूर आहे. कमालीच्या गरिबीमुळे आफ्रिकेत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.