50MP कॅमेरा अन्...POCO ने लॉन्च केले स्वस्त 5G फोन्स, किंमत फक्त रु. 7999 पासून सुरू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 20:01 IST2024-12-19T20:00:57+5:302024-12-19T20:01:47+5:30
जाणून घ्या या फोनचे फीचर्स...

50MP कॅमेरा अन्...POCO ने लॉन्च केले स्वस्त 5G फोन्स, किंमत फक्त रु. 7999 पासून सुरू...
POCO M7 Pro Price in India: स्मार्टफोन कंपनी POCO ने भारतीय बाजारात M7 Pro आणि C75 5G नावाचे दोन नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. POCO M7 Pro हा मध्यम श्रेणीचा फोन आहे. तर, POCO C75 5G एक बजेट डिव्हाइस आहे. कंपनीने M7 Pro मध्ये OLED डिस्प्ले, 50MP रियर कॅमेरा आणि 20MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.
POCO C75 5G मध्ये 5160mAh बॅटरी, 50MP रियर कॅमेरा आणि Qualcomm Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन नुकत्याच लॉन्च झालेल्या Redmi A4 5G चे रिब्रँडेड व्हर्जन आहे.
किंमत किती आहे?
POCO M7 Pro दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे, तर 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. हा फोन तुम्ही लॅव्हेंडर फ्रॉस्ट, लुनर डस्ट आणि ऑलिव्ह ट्वायलाइट रंगांमध्ये खरेदी करू शकता.
दुसरीकडे, POCO C75 5G फक्त एका कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याच्या 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये आहे. हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. 20 डिसेंबरपासून POCO M7 Pro आणि 19 डिसेंबरपासून POCO C75 5G उपलब्ध होईल.
फिचर्स काय आहेत?
POCO M7 Pro मध्ये 6.67-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 वापरण्यात आला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 7025 Ultra प्रोसेसरसह येतो.
यात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजचा पर्याय आहे. डिव्हाइस Android 14 वर आधारित HyperOS सह येतो. यात 50MP मेन कॅमेरा आणि 2MP सेकंडरी कॅमेरा आहे. फ्रंटला 20MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाइस 5110mAh बॅटरी आणि 45W चार्जिंगसह येतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
तर POCO C75 5G मध्ये 6.88-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात Qualcomm Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसर आहे. म्हणजे त्यावर Jio 5G काम करेल. हा डिवाइस Android 14 आधारित HyperOS सह येतो.
यात 50MP मेन लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. समोर 5MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. डिव्हाइसला चार्ज करण्यासाठी 5160mAh बॅटरी मिळते, जी 18W चार्जिंगने फास्ट चार्ज करता येते.