49 malicious apps found on google play store by trend micro | स्मार्टफोनमध्ये 'हे' धोकादायक अ‍ॅप्स आहेत?, त्वरीत करा डिलीट

स्मार्टफोनमध्ये 'हे' धोकादायक अ‍ॅप्स आहेत?, त्वरीत करा डिलीट

ठळक मुद्देGoogle Play Store वर 49 नवीन धोकादायक अ‍ॅप असल्याची माहिती.व्हायरस असलेले अ‍ॅप युजर्सना जबरदस्तीने जाहिरात दाखवतात.अ‍ॅप्स 30 लाख डिव्हाईसमध्ये इन्स्टॉल करण्यात आले आहेत. 

नवी दिल्ली - स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. विविध गोष्टींसाठी वेगवेगळ्या अ‍ॅपचा वापर केला जातो. मात्र काही अ‍ॅप्सचा वापर करणं हे युजर्सना चांगलंच महागात पडू शकतं. गुगल सिक्युरिटी सिस्टमच्या नकळत Google Play Store वर 49 नवीन धोकादायक अ‍ॅप असल्याची माहिती आता समोर आली आहे. फोटो अ‍ॅप्लिकेशन आणि गेमिंग अ‍ॅपचा यामध्ये समावेश आहे. व्हायरस असलेले अ‍ॅप युजर्सना जबरदस्तीने जाहिरात दाखवतात. ट्रेंडमायक्रोच्या रिपोर्टनुसार, हे अ‍ॅप्स 30 लाख डिव्हाईसमध्ये इन्स्टॉल करण्यात आले आहेत. 

सर्व अ‍ॅप्समध्ये मलीशस कोड कस्टम अल्गोरिदमने भरलेले आहेत. तसेच हे अ‍ॅप्स गुगल क्रोमला डिफॉल्ट अ‍ॅडवेअर ब्राऊजर बनवतात. त्यामुळे स्मार्टफोनच्या स्क्रीनवर एखादा क्रोम शॉर्टकट दिसत असेल, तर तुमच्या मोबाईलवर मालवेअर हल्ला झाला आहे हे युजरने समजून घ्यायला हवं अशी माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. मालवेअर इन्स्टॉल केल्यानंतर काही तासांनी विविध जाहिराती दाखवणं सुरू करतात. त्यामुळे या जाहिराती नेमक्या कोणत्या अ‍ॅपमुळे दिसतात याचा शोध घेणं कठीण ठरतं. ट्रेंडमायक्रोने सावध केल्यानंतर गुगलने हे सर्व अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन हटवले आहेत.

गुगलकडून हे अ‍ॅप डिलीट करण्यात आले असले तरी अनेक स्मार्टफोनमध्ये त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ट्रेंडमायक्रोने यापूर्वीही गुगल प्ले स्टोअरवर मलीशिअस अ‍ॅप्स शोधून काढले होते. ऑगस्टमध्ये ट्रेंडमायक्रोच्या संशोधकांनी 85 मलीशस अ‍ॅपचा शोध लावत माहिती जारी केली होती. याशिवाय ESET ने प्ले स्टोअरवरील 42 अ‍ॅप्सच्या कोडमध्ये एक व्हायरस असल्याचीही माहिती ऑक्टोबरमध्ये दिली होती. युजर्सच्या डेटासह पैशांचीही चोरी होऊ शकते अशी माहिती देखील समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

हॅकिंगपासून वाचण्यासाठी गुगलने दिला सल्ला; 'हे' अ‍ॅप त्वरित करा अपडेट

हॅकिंगच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हॅकर्स अत्यंत शिताफीने युजर्सचा डेटा चोरत आहेत. यामुळे युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र आता हॅकिंगपासून वाचण्यासाठी गुगलनेच एक नवा सल्ला दिला आहे. स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर गुगल क्रोमचा वापर केला जातो. त्यामुळे गुगलने आता सर्व क्रोम युजर्सना आपलं ब्राऊजर अपडेट करायला सांगितलं आहे. तसेच युजर्स क्रोमच्या लेटेस्ट व्हर्जनचा वापर करतील. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, क्रोमसाठी एक फिक्स रोलआऊट केलं आहे. ज्याच्या मदतीने युजर्स हॅकिंगपासून वाचू शकतात. ब्राऊजर अपडेट न केल्यास हॅकर्स युजर्सचं डिव्हाईस हॅक करू शकतात. गुगल क्रोमच्या या अपडेटच्या माध्यमातून जीरो डे वल्नरबिलिटी ठिक केली असल्याची माहिती डिजिटल ट्रेंड्सने दिली आहे. जुने व्हर्जन असलेल्या क्रोम बाऊजरवर हॅकिंगचं सावट आहे. 

 

Web Title: 49 malicious apps found on google play store by trend micro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.