३० टक्के भारतीय AI युजर चीनच्या डीपसीक मायाजालाचा वापर करू लागले; सर्व्हेतून धक्कादायक माहिती उघड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 12:31 IST2025-02-06T12:31:07+5:302025-02-06T12:31:46+5:30

China DeepSeek Indian User: इंटरनेटचा वापर करणारे निम्मे भारतीय सध्या एआयचा वापर करत आहेत.

30 percent of Indian AI users fall into China's deep-sea scam; Survey reveals shocking information | ३० टक्के भारतीय AI युजर चीनच्या डीपसीक मायाजालाचा वापर करू लागले; सर्व्हेतून धक्कादायक माहिती उघड 

३० टक्के भारतीय AI युजर चीनच्या डीपसीक मायाजालाचा वापर करू लागले; सर्व्हेतून धक्कादायक माहिती उघड 

इंटरनेटचा वापर करणारे निम्मे भारतीय सध्या एआयचा वापर करत आहेत. यापैकी ३० टक्के लोक चिनी एआय प्लॅटफ़ॉर्म डीपसीकवर स्विच झाल्याचा धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे. भारत सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना नुकताच चॅटजीपीटी, डीपसीक वापरू नका असा आदेश दिला होता. परंतू, जनता मात्र चीनच्या बाहुपाशात पुरती गुरफटत चालली आहे. 

चॅटजीपीटी हा सध्याचा सर्वाधिक वापरला जाणारा एआय आहे. परंतू, सर्व्हे केलेल्या एकूण युजरपैकी ३० टक्के युजर हे आता डीपसीक वापरू लागले आहेत. १८ टक्के लोकांना एआयने दिलेली माहिती चुकीची मिळाली आहे. तर ६६ टक्के लोक एआय देत असलेल्या सुचनांचे पालन करत आहेत. तर २५ टक्के लोक दुसऱ्या कामांसाठी याचा प्रयोग करत आहेत. 

हा सर्वे ३०९ जिल्ह्यांपैकी ९२ हजार लोकांमध्ये करण्यात आला आहे. ६% कोपायलट, ३% जेमिनी, ३% लामा, ९% क्लाउड, ९% पर्प्लेक्सटी, ६% काहीही नाही, २८% चॅटजीपीटी, ४०% इतर आणि ५% डोन्ट नो होते. इतरांच्या उत्तरात, लोकांनी गुगल किंवा इतर सर्च इंजिन वापरण्याबद्दल सांगितले. 

सरकारने का बंदी घातली....
ऑफिस संगणक आणि उपकरणांमध्ये एआय टूल्स आणि चॅटजीपीटी आणि डीपसीक सारख्या एआय अॅप्सचा वापर सरकारी डेटा आणि कागदपत्रांच्या गोपनीयतेला धोका निर्माण करतो, असे सरकारचे म्हणणे आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एआयच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इटली सारख्या देशांनी गोपनीयता आणि डेटा सुरक्षेच्या चिंतेमुळे चिनी एआय कंपनी डीपसीकपासून त्यांच्या अधिकृत प्रणालींचे संरक्षण करण्याची घोषणा केली आहे. 

Web Title: 30 percent of Indian AI users fall into China's deep-sea scam; Survey reveals shocking information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.