१९... भिवापूर... वन

By Admin | Updated: December 19, 2014 22:57 IST2014-12-19T22:57:05+5:302014-12-19T22:57:05+5:30

(फोटो)

19 ... Bhivapur ... one | १९... भिवापूर... वन

१९... भिवापूर... वन

(फ
ोटो)
वन कर्मच्याऱ्यांची आरोग्य तपासणी
भिवापूर : उमरेड क ऱ्हांडला अभयारण्य व डब्ल्यू.सी.टी. संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नवेगाव येथील विश्रामगृहात वन कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या मोफत औषधांचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी वन परिक्षेत्र अधिकारी जी.एफ. लुचे, ए.एल. आवारी, विजय गायकवाड, गुणवंत वैद्य, डॉ. आरती गोल्हर प्रामुख्याने उपस्थित होते. वन्यप्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी वन्य अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस कर्तव्यावर असतात. त्यांच्या आरोग्याची तपासणी व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उमरेड, भिवापूर, कुही, पवनी (जिल्हा भंडारा) वन परिक्षेत्रातील ११० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यशस्वितेसाठी स्मिता चाफले, सुचिता गोंडे, माधुरी बोंदाडे, अक्षय कहनकर, अमोल संदोक, प्रशांत चहांदे आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
***

Web Title: 19 ... Bhivapur ... one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.