ओमान स्पर्धेमुळे चिंता वाढलेली - कमल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 04:04 IST2020-03-17T04:04:10+5:302020-03-17T04:04:33+5:30
पोलंड ओपन जेव्हा स्थगित झाली तेव्हा येथे येऊन मी घोडचूक तर केली नाही ना, असा विचार मनात घोळत होता

ओमान स्पर्धेमुळे चिंता वाढलेली - कमल
नवी दिल्ली : भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू शरथ कमलने रविवारी दहा वर्षांनंतर आपले पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावले; परंतु या स्पर्धेदरम्यान त्याच्या मनात कोरोना विषाणूमुळे ओमानला येऊन जीवनातील घोडचूक तर केली नाही ना? असे विचार घोळत होते.
यावेळी जगभरातील स्पर्धा रद्द किंवा स्थगित झाले होते. जागतिक संघटनेने एप्रिलअखेरपर्यंतच्या सर्वच स्पर्धा स्थगित केल्या. शरथने म्हटले, ‘पोलंड ओपन जेव्हा स्थगित झाली तेव्हा येथे येऊन मी घोडचूक तर केली नाही ना, असा विचार मनात घोळत होता.’ शरथने सावधगिरीचे पाऊल उचलताना घरात स्वत:ला वेगळे ठेवले. (वृत्तसंस्था)