स्टीव्ह स्मिथच्या नाबाद ९१ आणि ग्लेन मॅक्सवेलच्या ७० धावांच्या बळावर विश्वचषकाची तयारी म्हणून खेळविण्यात आलेल्या सराव सामन्यात आॅस्ट्रेलिया एकादशने शुक्रवारी न्यूझीलंड एकादशचा डकवर्थ-लुईस नियमाच्या जोरावर पाच गड्यांनी पराभव केला. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंकेचे माजी खेळाडू नुआन झोएसा आणि अविष्का गुणवर्धने यांना संयुक्त अरब अमिरातीतील एका टी१० लीगमध्ये भ्रष्टाचारात सामील असल्याच्या आरोपावरून निलंबित केले. ...
संघात पुनरागमन करणरा रुपिंदरपालसिंग याने भारताचे खाते उघडल्यानंतर युवा स्ट्रायकर सुमित कुमार ज्युनियर याने दोन गोल नोंदवला. यासह भारतीय पुरुष हॉकी संघाने आॅस्ट्रेलिया अ संघावर ३-० ने एकतर्फी विजय नोंदवला असून या दौऱ्यात भारताचा हा दुसरा विजय आहे. ...
भारताच्या अंकिता रैना हिने लुआन येथे युडिस वोंग चोंग हिचे कडवे आव्हान मोडीत काढताना शुक्रवारी ६०,००० डॉलर बक्षीस रकमेच्या आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेच्या एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. ...
हॉकी इंडियाने २० मेपासून सुरू होणाºया कोरिया दौºयातील तीन सामन्यांच्या मालिकेसाठी स्ट्रायकर राणी रामपाल हिच्याकडे महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविले आहे. ...
मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) त्यांच्या वरिष्ठ संघासह अन्य संघांच्या प्रशिक्षकांसाठी अर्ज मागितले आहेत. प्रतिष्ठित रणजी ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रशिक्षकाला १२ लाख रुपये बोनस रक्कम देण्याच्या तरतुदीचा त्यात समावेश आहे. ...
विशाखापट्टणम, आयपीएल 2019 : पहिल्या षटकापासून दिल्ली कॅपिटल्सवर नशीब रुसलेलं पाहायला मिळालं. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी ... ...