शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

चोºया रोखण्यासाठी युवकांची गस्त; दिवसा नोकरी.. रात्री मात्र ‘जागते रहो’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 2:05 PM

सोलापूर अलर्ट; विमानतळ परिसरातील पंचवीस मंडळंही सरसावली

ठळक मुद्देदिवसभरात या सर्वच नगरांमध्ये फेरीवाले, भंगारवाले, साड्या अन् बेडशीट कव्हर विकणारे येत असतातहोटगी रोडवरील विमानतळासमोर हत्तुरे वस्तीत स्वामी विवेकानंद नगर, मल्लिकार्जुन नगर, लक्ष्मी नगर आदी नगरांचा समावेशपोलिसांची वाट न पाहता आपणच गस्त घालून चोरट्यांना हुसकावून लावण्याचा विडा काही नोकरदार आणि महाविद्यालयीन युवकांनी उचलला

सोलापूर : पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पाच घरफोड्या... एका महिलेचा गळा दाबून मंगळसूत्र पळवले... दिवसभरात भुरट्या चोºयांचे वाढलेले प्रमाण पाहता २५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे शिक्षण घेणारे कार्यकर्ते अन् नोकरदार रात्रीची गस्त घालत कडा पहारा देत आहेत. चोºया रोखण्यासाठी रात्री १२ ते  पहाटे ५ पर्यंत ‘जागते रहो...’चा इशारा देताना ही मंडळी जणू पोलिसांची भूमिका बजावत आहेत.

विमानतळ परिसरातील हत्तुरे वस्तीतील अनेक नगरांमध्ये हे चित्र पाहताना तेथील नागरिक मात्र शांततेची निद्रा घेत असावेत.होटगी रोडवरील विमानतळासमोर हत्तुरे वस्तीत स्वामी विवेकानंद नगर, मल्लिकार्जुन नगर, लक्ष्मी नगर आदी नगरांचा समावेश आहे. पाच घरफोड्यांमुळे सर्वच नगरांमधील नागरिक भयभीत झाले होते. त्यातच एका महिलेचा गळा दाबून तिचे मंगळसूत्र पळवण्याची घटना इथल्या नागरिकांनी गंभीरतेने घेतली आहे. पोलिसांची वाट न पाहता आपणच गस्त घालून चोरट्यांना हुसकावून लावण्याचा विडा काही नोकरदार आणि महाविद्यालयीन युवकांनी उचलला. 

श्रीधर सोनकटले, संदीप काळे, निखिल छत्रबंद, नागेश बंकूर, सुरेश विरपे, सागर माशाळे, श्रीशैल कलशेट्टी, ओंकार कदम, राजेश मुगळीकर, विशाल सुतार, अमन नन्ना, सुरेश कांबळे यांच्यासह शेकडो नोकरदार, युवक हातात काठ्या घेऊन अन् शिट्ट्या वाजवत पहाटे ५ पर्यंत प्रभावी गस्त घालत आहेत. दोन दिवसांपासून पडणाºया पावसाची तमाही न बाळगता आपली सामाजिक ड्यूटी चोखपणे बजावताना दिसतात. 

दिवसा वावरणाºया फेरीवाल्यांची चौकशी

  • दिवसभरात या सर्वच नगरांमध्ये फेरीवाले, भंगारवाले, साड्या अन् बेडशीट कव्हर विकणारे येत असतात. कोणी विक्रेता कुणाच्याही घरासमोर आला की, त्या भागातील पुरुष मंडळी अथवा युवक त्याची कसून चौकशी करतात. 
  • .संशय आला की, त्याला तेथूनच हुसकावून लावले जाते. जे दिवसाचे सूत्र आहे तेच सूत्र रात्रीची गस्त घालणारे युवक वापरत असतात. 
  • .रात्री कोणी अनोळखी आला की, त्याला कोठून आला? कोणाकडे जायचे आहे? काय काम आहे? आदी प्रश्न विचारून शंकेचे निरसनही करून घेतात.

पोलिसांची गस्त असावी...हत्तुरे वस्तीतील सर्वच नगरांमध्ये गस्त घालणारे युवक सांगतात, आमच्या या कार्याला पोलिसांचा पाठिंबा आहेच. त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही प्रभावी गस्त घालत असताना चोरीची एकही घटना घडली नाही. 

माझ्या प्रभागातच नोकरदार आणि युवकांची ही गस्त कौतुकास्पद आहे. गस्तीसाठी ७ ते ८ ग्रुप पाडले असून, त्यांना बॅटºयाही देण्यात दिल्या आहेत. पाण्याच्या बाटल्याही जरूर देऊ. या गस्तीला पोलिसांचे चांगलेच सहकार्य आहे.-वैभव हत्तुरे, नगरसेवक.  

टॅग्स :SolapurसोलापूरAirportविमानतळCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस