गुप्तांगावर चेंडू आदळून तरुणाचा मृत्यू; पंढरपूरमधील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 13:25 IST2022-08-08T13:19:22+5:302022-08-08T13:25:02+5:30
विक्रम हा खेळाडू नेपतगाव या संघाकडून फलंदाजी करत होता.

गुप्तांगावर चेंडू आदळून तरुणाचा मृत्यू; पंढरपूरमधील दुर्दैवी घटना
पंढरपूर : क्रिकेट स्पर्धेत खेळताना चेंडू गुप्तांगाला लागल्याने तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे घडली. विक्रम क्षीरसागर (वय ३५) असे त्या दुर्दैवी खेळाडूचे नाव आहे.
विक्रम हा खेळाडू नेपतगाव या संघाकडून फलंदाजी करत होता. त्यावेळी प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाने टाकलेल्या वेगवान चेंडूचा अंदाज न आल्याने चेंडू विक्रमच्या गुप्तांगाला लागला आणि तो काही क्षणातच मैदानात कोसळला. त्याला तातडीने उपचारासाठी हलविले. मात्र, यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण भागात विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धा होत असतात. मात्र, क्रिकेट खेळताना लागणारी संरक्षक साधने, गार्डस या खेळाडूंकडे नसल्याने असे दुर्दैवी प्रकार होतात.