प्रणिती शिंदेंच्या मंत्रीपदासाठी युवक काँग्रेसचे सोलापुरात आंदोलन
By Appasaheb.patil | Updated: January 2, 2020 13:07 IST2020-01-02T13:06:39+5:302020-01-02T13:07:59+5:30
सोलापुरातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी दिले सामुहिक राजीनामे

प्रणिती शिंदेंच्या मंत्रीपदासाठी युवक काँग्रेसचे सोलापुरात आंदोलन
सोलापूर : महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रणिती शिंदे यांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीनेकाँग्रेस भवन येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी महापौर आरिफ शेख, युवकचे अध्यक्ष अंबादास करगुळे, नगरसेविका फिरदोस पटेल, गणेश डोंगरे, तिरूपती परकीपंडला, नगरसेवक विनोद भोसले, अंबादास गुत्तीाकोंडा, शौकत पठाण, शाहू सलगर, श्रीधर गायकवाड, बसवराज कोळी, सिद्राम अट्टेलुर आदी काँग्रेसचे आजी, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडीमधील काही लोकांनी विशिष्ट जातीपातीचे राजकारण करून प्रणिती शिंदे यांना डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे़ सोलापुरकरांच्या मनात सुध्दा आहे की प्रणिती शिंदे यांना मंत्रीपदावर विराजमान करावं, आम्ही युवक काँग्रेसच्या सर्वच पदाधिकाºयांनी सामुहिक राजीनामे दिले असल्याचेही नगरसेवक विनोद भोसले यांनी सांगितले.