Young man beaten for asking for information from Gram Panchayat | ग्रामपंचायतीकडे माहिती मागितल्याने तरुणाला मारहाण

ग्रामपंचायतीकडे माहिती मागितल्याने तरुणाला मारहाण

वैराग : रातंजन (ता. बार्शी) ग्रामपंचायतीकडे माहिती मागितल्याच्या कारणावरून तरुणाला शिवीगाळ करुन काठीने मारहाण केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी वैराग पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या रोजगार सेवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रातंजन एस.टी. बस स्थानकासमोर हा प्रकार घडला. याबाबत फुलचंद भागवत हजारे (वय ३०, रा. रातंजन ता. बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फुलचंद हजारे यांनी पंचवार्षीकच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने किती ओढ्याचे खोलीकरण, रुंदीकरण, घरकुल योजना, विहिरीची यांची माहिती मागितली. राेजगार सेवक मिथून महादेव चव्हाण (रा.रातंजन) यांची रातंजन ग्रामपंचायतच्या रोजगार सेवकपदी कधीपासून व कोणी नेमणूक केली. याबाबतची माहिती माहिती मागीतली होती. अपुरी माहिती मिळाली म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपिल केले होते.

दरम्यान ग्रामपंचायतीचा रोजगार सेवक मिथून चव्हाण हा बुधवारी सकाळी बस स्थानकासमोर आला. माझी वैयक्तिक माहिती मागायचा तुझा काय संबंध आहे? म्हणत शिवीगाळ, दमदाटी करुन काठीने मारहाण केली.

Web Title: Young man beaten for asking for information from Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.