शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

युवा भारत २०२० प्रेरणादायी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 10:52 IST

‘ भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे...’ या आपल्या प्रतिज्ञेला आपण ...

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे...’ या आपल्या प्रतिज्ञेला आपण सारेच कटिबद्ध आहोत. ज्या देशात, ज्या राज्यात, ज्या समाजात आपण राहतो त्या ठिकाणच्या प्रत्येक गोष्टीवर आपले प्रेम असायला हवे, त्याच्याबद्दल आदर असायला हवा. आपल्या देशाचा सर्वांगीण विकास होऊन सबंध जगामध्ये आपल्या देशाचे नाव एका वेगळ्या विधायक उंचीवर पोहोचणे, हे प्रत्येक देशवासीयाचे ध्येय असायला हवे. 

आपल्या देशाला थोर विचारवंतांचे वरदान लाभलेले आहे. या थोर मंडळींनी कितीतरी वर्षांपूर्वी आपल्या देशाच्या सर्वांगीण अशा विकासासंदर्भात, देशातील समाजव्यवस्थेबद्दल खूप काही विधायक संकल्पना मांडलेल्या होत्या आणि त्या दिशेने त्यांची वाटचालही होती. छत्रपती शिवरायांनी ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना करून एका आदर्श अशा ‘रयतेच्या राजा’ची भूमिका जगासमोर आणली. स्वामी विवेकानंदानी अमेरिकेतील शिकागो येथील धर्मपरिषदेमध्ये हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, आपल्या देशाचा इतिहास, परंपरा या गोष्टींचे भव्य दर्शन घडवून आणले. स्वामी विवेकानंदांचे युवकांच्या माध्यमातून निर्माण होणारे समर्थ भारत देशाचे स्वप्न होते. त्यांच्या मते समाजातला सामान्य माणूसच देशाचा कणा आहे आणि समाजाची एकरसता हेच आपल्या राष्टÑाचे बल! 

सध्याचे २०२० हे वर्ष अनेक अर्थाने खूपच प्रेरणादायी आहे. निसर्गाने आपल्या कृतिशीलतेला बहाल केलेल्या या वर्षामध्ये या थोर मंडळींच्या विचारधारेला पुढे घेऊन जाण्याची हीच ती वेळ आहे. २००० साली गांधीवादी मिसाईलमॅन, माजी राष्टÑपती अब्दुल कलाम यांनी ‘विकसित भारत’ देशाचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ५०० हून अधिक जणांची सांघिक शक्ती कार्यरत होती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘व्हिजन २०२०’ हा प्रकल्प त्यांनी तयार केलेला होता. येणाºया २० वर्षांमध्ये देशाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा या प्रकल्पामध्ये होता. राष्ट्रपती बनण्यापूर्वी कलामांनी ‘इंडिया २०२० : ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ हे पुस्तक त्याच वेळेस लिहिलेले आहे. या पुस्तकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसनशील देशाला विकसित भारत देशात रूपांतरित करून देशातल्या प्रत्येकाचे जीवन सुलभ, सुखी आणि समृद्ध करण्यासाठीच्या उपाययोजनांची नोंद आहे. 

‘याची देही याची डोळा...’ सन २०२० च्या आधुनिक वर्षामध्ये आपल्या सर्वांचे पदार्पण झालेले आहे. एकविसाव्या शतकाच्या तिसºया दशकाकडे आपली वाटचाल सुरू आहे. देशाचा एक सर्वसामान्य पण जागरूक नागरिक या नात्याने राष्ट्रबांधणीच्या या महायज्ञामधे आपल्याला कृतिशीलतेच्या माध्यमातून ‘समिधा’ अर्पण करायच्या आहेत. आज देशामध्ये तरुणाईची प्रचंड मोठी संख्या आहे आणि ही तरुणाई सर्वसमावेशक अशा देशविकासासाठी देशाचे एक बलस्थान आहे. 

आपल्या रोजच्या दैनंदिनीमध्ये इतरांसाठी वेगळे विधायक करण्याची प्रखर इच्छा जोपासणे आणि त्यातून सातत्याने कृती करत राहण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रउभारणीसाठी, राष्ट्रातल्या नागरिकांसाठी, आपण राहतो त्या ठिकाणच्या समाजासाठी जेवढे शक्य आहे तेवढे तन-मन-धनाने कार्यरत राहणे अपेक्षित आहे. देशातल्या अगदी शेवटच्या थरातील व्यक्तीचा विकास म्हणजे देशविकास होय. त्यामुळे ‘विकसित’ देशाच्या निर्माणासाठी देशातल्या प्रत्येक घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचणे गरजेचे आहे. 

आज अनेक व्यक्ती, संस्था, स्थानिक प्रशासन, शासन यासाठी कार्यरत आहे. आपणही आपल्या जबाबदारीच्या जाणिवेसह आपली सदसद्विवेकबुद्धी कायम जागृत ठेवून समाजाच्या उन्नतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो, या उदात्त भावनेतून समाजाच्या हिताचा विचार सातत्याने करण्याची प्रतिज्ञा घेण्याची ही वेळ आहे. स्पर्धात्मक युगामध्ये स्वत:ला काळाच्या एक पाऊल पुढे ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशासाठी पूरक असणाºया गोष्टी निर्माण करण्याची  ताकद आजच्या युवक आणि युवतींच्या मनगटात आहे. देशातल्या लोकशाहीला आणि देशाच्या अखंडतेला अबाधित ठेवणे, देशावर शाश्वत प्रेम करणे, इतरांबद्दल बंधुभाव जोपासणे, अन्यायाविरुद्ध पेटून उठणे, चांगल्या गोष्टींचे समर्थन आणि कौतुक करणे, भारतीय परंपरेची व जीवनमूल्यांची जपणूक करणे, पर्यावरणपूरकता जोपासणे या आणि अशा अनेक  विधायक गोष्टी आत्मसात करून एक आदर्श जीवन जगण्यासाठी आपण सारे कटिबद्ध राहूया...! - अरविंद म्हेत्रे(लेखक पर्यावरण चळवळीचे अभ्यासक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरIndiaभारत