अक्कलकोटचा योगेश, खर्डीचा राहुल, उपळाईची अश्विनी अन् पंढरपूरचा अभयसिंह झाले आयएएस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 14:17 IST2020-08-04T14:15:43+5:302020-08-04T14:17:21+5:30
शेतकºयांची मुलं झाली आयएएस; देशातंर्गत परीक्षेत सोलापूरची मान उंचावली

अक्कलकोटचा योगेश, खर्डीचा राहुल, उपळाईची अश्विनी अन् पंढरपूरचा अभयसिंह झाले आयएएस
सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत अक्कलकोटचा योगेश कापसे, खर्डी (ता. पंढरपूर) चा राहुल चव्हाण तर पंढरपूरचा अभयसिंह देशमुख यांनी यश मिळविले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा सप्टेंबर २०१९ मध्ये झाली होती, तर मुलाखती फेबु्रवारी आणि आॅगस्ट २०२० मध्ये घेण्यात आल्या होत्या. याच परीक्षेत मंगळवेढ्यातील एकजण व वाघोली (ता. माळशिरस) येथील सागर मिसाळ हाही उत्तीर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.