अक्कलकोटमध्ये चिमुकल्यांना प्रात्यक्षिकांतून योगाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:15 IST2021-06-23T04:15:36+5:302021-06-23T04:15:36+5:30

अक्कलकोट : योगदिनाचे औचित्य साधून विवेकानंद प्रतिष्ठान व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी अक्कलकोट शहरात विठ्ठल ...

Yoga lessons from demonstrations to Chimukalya in Akkalkot | अक्कलकोटमध्ये चिमुकल्यांना प्रात्यक्षिकांतून योगाचे धडे

अक्कलकोटमध्ये चिमुकल्यांना प्रात्यक्षिकांतून योगाचे धडे

अक्कलकोट : योगदिनाचे औचित्य साधून विवेकानंद प्रतिष्ठान व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी अक्कलकोट शहरात विठ्ठल मंदिर पटांगणात योगशिबिर पार पडले. यावेळी चिमुकल्यांनी प्रात्यक्षिकांतून योगाचे धडे गिरविले.

योगशिक्षक मोहन कुंभार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शिबिराला सुरुवात झाली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, अविनाश मडिखांबे, प्रभाकर मजगे,दयानंद बिडवे, मल्लिकार्जुन मसुती, विलास कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. योगप्रशिक्षक मोहन कुंभार यांनी कोरोनाकाळात योगाचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिके सादर केली.

योगशिबिरास राजकुमार उंबराणीकर, विजयकुमार पाटील, विश्वनाथ देवरमनी, लक्ष्मण पाटील, नगरसेवक मीलन कल्याणशेट्टी, राजकुमार झिंगाडे, मल्लिकार्जुन अ‌ाळगी, ऋषी लोणारी, अंकुश चौगुले, आतिश पवार, डाॅ.सतीश बिराजदार, चंद्रकांत दसले उपस्थित होते.

--

फोटो : २१ अक्कलकोट

अक्कलकोट येथे योगशिबिरात लहान मुलांसह ज्येष्ठांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून योगाचे धडे गिरवले.

-----

Web Title: Yoga lessons from demonstrations to Chimukalya in Akkalkot