एका एकरात घेतले ११० टन उसाचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST2020-12-30T04:29:07+5:302020-12-30T04:29:07+5:30
१५ वर्षांपासून दोन एकरमध्ये द्राक्षबागेचे पीक होते. परंतु अवकाळी पावसमुळे द्राक्षबाग भुईसपाट झाली. सतत अवकाळीचा पाऊस व बागेवर पडणाऱ्या ...

एका एकरात घेतले ११० टन उसाचे उत्पन्न
१५ वर्षांपासून दोन एकरमध्ये द्राक्षबागेचे पीक होते. परंतु अवकाळी पावसमुळे द्राक्षबाग भुईसपाट झाली. सतत अवकाळीचा पाऊस व बागेवर पडणाऱ्या रोगामुळे द्राक्षाच्या बागेवर नांगर फिरवला आणि त्याच जमिनीमध्ये २६५ या जातीच्या उसाची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
जमिनीची मशागत केली, चार फुटांची सरी सोडून दोन डोळ्यांचे बेणे काढून दीड फूट अंतरावर उसाच्या कांडीची ऑगस्ट महिन्याच्या शेवटी एकरात दीड गोणी युरिया टाकून लागवड केली. आडवी उसाच्या कांडीची लागवड केल्यामुळे उसाला चांगला फुटवा आला. खुरपणी व वेळोवेळी रासायनिक खताची मात्रा व द्राक्षबागेचे क्षेत्र असल्यामुळे वेळोवेळी शेण घातल्यामुळे जमीन सुपीक झाली होती. त्यामुळे उसाची कमी दिवसात चांगली वाढ झाली. एकरात २८ हजार रुपये खर्च करून एक वर्षात २ लाख २० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.
असा केला खर्च
मशागत ५ हजार, ऊस बेणे ४ हजार, खुरपणी ५ हजार, ऊस बांधणी ४ हजार, रासायनिक खत ७ हजार, मजुरांना ३ हजार असे एकूण २८ हजार रुपये खर्च केले.
कोट ::::::::::::::::::::::::::::
शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वेळोवेळी लक्ष घालून रासायनिक, सेंद्रिय खताचे व पाण्याचे नियोजन केल्यास शेतीमधून घेतलेल्या पिकापासून भरघोस उत्पन्न मिळू शकते.
- भारत चव्हाण,
ऊस उत्पादक शेतकरी, सुस्ते
फोटो ओळी ::::::::::::::::::::::
सुस्ते (ता. पंढरपूर) येथील शेतातील पन्नास ते साठ कांड्यांवर असलेला ऊस दाखवताना शेतकरी भारत चव्हाण.