शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

होय, अशीच आदर्श विवाह पद्धती हवी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 10:52 IST

अफाट श्रीमंतापासून ते कमालीचे दारिद्र्य असलेल्यापर्यंतचे सगळेच रस्त्यावर आले.

लग्न अथवा विवाह म्हटलं की वर आणि वधू दोघांच्याही आईबापाचे कंबरडे मोडलेच समजा. दोन नवदाम्पत्यांना संसाराचे सोपस्कार सुरू करण्यासाठी मंडपापासून देवदेवस्की करण्यापर्यंत अनेकानेक समस्यांना सामोरे जावे लागते. आर्थिक झळ बसल्याशिवाय लग्न होणेच शक्य नाही. अगदी वधूशोधापासून सुरू झालेली ही कथा अक्षता पडेपर्यंतच नव्हे तर त्या नंतरच्याही विधीपर्यंत चालूच असते. कांदापोहेपासून ते गोंधळाच्या जेवणापर्यंत घरच्यांचा नुसता गोंधळ उडालेला असतो. त्यामुळे साहजिकच सगळे गोंधळलेले असतात.

लग्नाशी संबंधित मंडप, मंगल कार्यालय, कपडेलत्ते, अल्पोपहार, सुग्रास जेवण, डेकोरेशन, वेगवेगळ्या प्रकारच्या विधीक्रिया, घोडा, बॅन्डबाजा, फटाके, भेटवस्तू, मुंडावळ्या, बाशिंग, रुखवत, भटजीबुवा, पूजापाठ, हारतुरे यासारख्या अनेक बाबी येतात आणि खूप मोठा खर्च आई-वडिलांना सोसावा लागतो. मग या खर्चासाठी वर-वधू दोघांच्याही आई-वडिलांना बँक, सोसायट्या, सावकारीच्या विळख्यातून जावे लागते. भरमसाठ झालेल्या खर्चामुळे पुढे आयुष्यभर पै-पैचा हिशोब चुकता करण्यासाठी चपला झिजवाव्या लागतात. आधीपासूनच या खर्चासाठी केलेल्या योग्य नियोजनामुळे काहींची या विळख्यातून सुटका होते. गडगंज संपत्ती असणाºयांना ही झळ पोहोचतच नाही, परंतु सर्वसामान्यांच्या पाचवीला पूजलेलं हे चक्र मात्र जास्तच त्रासदायक ठरते.

प्रचलित लग्न वा विवाह सोहळ्यामुळे बºयाच लोकांना त्रास झाला अन् होतो आहे आणि यात काहीच बदल नाही झाले तर त्रास होतच राहणार. आमच्याच  एका नातेवाईकांनी ऐपत नसतानाही मुलाचं धूमधडाक्यात लग्न लावून दिलं. उसनेपासने करून कसाबसा विवाह सोहळा पार पडला परंतु विवाहानंतर दुसºयाच महिन्यापासून देणेकरी वाट अडवू लागले. शेवटी वैतागून घर विकून देणेकºयांचे समाधान करून ते घरापासूनच परागंदा झाले. सांगा तुम्हीच काय म्हणावे या वृत्तीला? ही झाली आर्थिक विवंचनेची बाजू. नातेवाईकातील रूसवे फुगवे, उपस्थित राहणाºयांची कमी अधिक संख्या, जेवणावळीवरून होणारे वाद, कपडेलत्त्यांमुळे होणारी नाराजी, नात्यानात्यातील कलह, या असंख्य कारणांमुळे होणारा मानसिक त्रास परिणामी मनावर येणारा ताण याशिवाय सामाजिक बांधिलकीमुळे होणारा त्रासही आहेच म्हणा. या साºया कारणांमुळेच, ‘लग्न करणे म्हणजे आयुष्यातील मोठी चूक’ वाटते.

कोरोना महामारीमुळे संपूर्ण विश्वच स्थितप्रज्ञ झाले. अफाट श्रीमंतापासून ते कमालीचे दारिद्र्य असलेल्यापर्यंतचे सगळेच रस्त्यावर आले. इतर देशांप्रमाणे भारतही कुलूपबंद झाला आणि सगळ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले, जगण्या मरण्यात भ्रांत निर्माण झाली. शासकीय, खासगी, सहकारी, मालकी सर्वच संस्था बंद झाल्या. अगदी हातावर पोट असणाºयांनाही घरीच राहण्याची सक्ती झाली. त्यामुळे साहजिकच सगळ्यांचे सर्वच नियोजन कोलमडले. त्यात विवाह सोहळेही आलेच म्हणा. अगदी तोंडावर लग्न असणाºयांनाही तोंडावर बोट आणि डोळ्यावर पट्टी बांधण्याची वेळ आली. विवाहेच्छुकांचा हिरमोड झाला. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमुळे धाबेही दणाणले. अगदी जूनपर्यंत सगळं काही चिडीचूप. अनलॉक सुरू झाले अन् सगळेच पुन्हा वेगवेगळ्या नियोजनामागे लागले. लग्नघटिका समीप येऊन लॉकडाऊनच्या शिक्षेमुळे हिरमुसलेले पुन्हा प्रफुल्लित झाले. आता लग्नाला परवानगी मिळाली खरी परंतु ठरलेल्या चाकोरीच्या बाहेर न जाण्याची तंबीही मिळाली. ५० च्यावर वºहाडी नाकारले गेले. मग आलीच की पंचाईत. पण यामुळे आईबापावरील प्रचंड ताण मात्र कमी झाला. मोजक्याच ५० भाग्यवान वºहाडामुळे आता सगळेच सुरळीत होणार याची खात्री झाली बरं का!

अशाच एका आदर्श विवाहाचे आम्ही आॅनलाईन साक्षीदार ठरलो. नवापूर (नंदूरबार) येथील आमचे ज्येष्ठ सन्मित्राचे चिरंजीव नुकतेच विवाहबद्ध झाले. ना सनई चौघडा, ना मिरवणूक, ना बडेजाव आणि विशेष म्हणजे ना वायफळ खर्च पण शांत, सुंदर, शिस्तबद्ध लग्नसोहळा संपन्न झाला. लग्नात उपस्थित होते त्यांनी लांबून आणि जे नव्हते त्यांनी हवाईमार्गे (आॅनलाईन) शुभेच्छा, आशीर्वाद देऊन नवदाम्पत्याच्या नवसंसाराला श्रीगणेशा करण्यासाठी प्रेरणा दिली. मग सांगा इथे शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक ताण पडला का? नाही ना! होय म्हणूनच आदर्श विवाहपद्धतीची सुरुवात झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कोरोना आज ना उद्या संपेल परंतु कोरोनामुळे झालेला हा बदल परिवर्तनीय आहे आणि यापुढेही अशाचप्रकारे विवाह सोहळे होण्यास काय हरकत आहे?- आनंद घोडके,(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.) 

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्न