शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अरे व्वा...सोलापुरातील प्रिसिजनने भारतात बनविली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 5:20 PM

नव्या इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा कमी खर्चात रेट्रोफिटिंग शक्य, प्रिसिजनची नवी झेप

सोलापूर : जगभरातील नावाजलेल्या वाहन उत्पादकांना कॅमशाफ्ट्सचा पुरवठा करणाऱ्या प्रिसिजन उद्योगसमूहाने भारतात पहिली मध्यम आकाराची रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस बनविली आहे. वाहन उद्योग क्षेत्रातील ही अत्यंत ऐतिहासिक घटना आहे. वाहतूकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न जगभरात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रिसिजन उद्योगसमूहाने मोठं पाऊल टाकलं आहे.

प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक करण शहा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी कंपनीचे चेअरमन यतिन शहा उपस्थित होते. 

प्रिसिजनने डिझेलवर चालणाऱ्या २३ आसन क्षमतेच्या प्रवासी बसचे रूपांतर इलेक्ट्रिक बसमध्ये केले आहे. मध्यम आकाराची प्रवासी बस इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतरित होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. ही वातानुकूलित बस एका चार्जिंगमध्ये १८० किलोमीटर धावेल. प्रिसिजनची इलेक्ट्रिक व्हेईकल टीम वर्षभर या प्रोजेक्टवर पुणे येथे काम करत होती. यासाठी पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) संस्थेने या बसचे टेस्टिंग करत प्रिसिजनला सहकार्य केले. या बसचे लवकरच शासनासमोर सादरीकरणही केले जाणार आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय पुढे येत आहे. मात्र संपूर्ण नवे इलेक्ट्रिक वाहन बनविण्याचा खर्च मोठा असतो. त्यामुळे जुन्या वाहनाचे 'रेट्रोफिटिंग' ही संकल्पना पुढे आली. यामध्ये वाहनाचे इंजिन काढून त्याला इलेक्ट्रिक ड्राईव्हलाईन बसविली जाते. अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी सुरुवातीची गुंतवणूक मोठी असली तरी ऑपरेटिंग कॉस्ट खूप कमी असणार आहे.

प्रिसिजनने मे २०१८ मध्ये नेदरलँड्समधील 'इमॉस मोबील सिस्टिम्स बी. व्ही.' ही इलेक्ट्रिक ड्राईव्हलाईन उत्पादक कंपनी संपादित केली. इमॉसमुळे प्रिसिजन समूहाकडे इंधनावर चालणाऱ्या वाहनाचे इलेक्ट्रीफिकेशन करण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले. इमॉसने आतापर्यंत ६०० पेक्षाही अधिक जड वाहनांचे इलेक्ट्रिफिकेशन केले आहे. त्यानंतर ही वाहने एकूण १६ कोटी किलोमीटर्सपेक्षाही अधिक अंतर यशस्वीरीत्या धावली आहेत, असेही करण शहा यांनी सांगितले.

"इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेतील संधी ओळखून प्रिसिजनने नेदरलँड्समधील 'इमॉस' कंपनी संपादित केली होती. रेट्रोफिटेड वाहन म्हणजे माननीय पंतप्रधानांच्या 'आत्मनिर्भर भारत' योजनेला अनुसरून टाकलेले पाऊल आहे. संपूर्णतः देशी बनावटीची रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस भारतीय बाजारात आणून खऱ्या अर्थाने 'मेड इन इंडिया' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न आहे."- यतिन शहा  (चेअरमन, प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लि.) 

"प्रिसिजन ही आर्थिकदृष्ट्या अत्यंत मजबूत ताळेबंद असणारी कंपनी आहे. भविष्यातील व्यवसायवाढीच्या दृष्टीने आम्ही इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात नियोजनबद्ध गुंतवणूक करणार आहोत. यामुळे देशातील इलेक्ट्रिक पार्ट्स बनविणाऱ्या उद्योगांनाही चालना मिळेल."- रविंद्र जोशी  (मुख्य वित्तीय अधिकारी, प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लि.)

"प्रिसिजनची रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या बसच्या इलेक्ट्रिक ड्राईव्हलाईनचे ६० टक्के पार्ट्स हे भारतातच तयार झाले आहेत. आगामी काळात संपूर्णपणे स्वदेशी पार्ट्स वापरण्याचे उद्दिष्ट प्रिसिजनने बाळगले आहे. युरोपातील अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतीय बाजारपेठेच्या दृष्टीने योग्य किंमतीत उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 'लास्ट माईल डिलिव्हरी' अर्थात शेवटच्या ग्राहकापर्यंत मालवाहतूक करणारी हलकी वाहने इलेक्ट्रिक करण्यावर आमचा भर असेल."- करण शहा (कार्यकारी संचालक, प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लि.)

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसायRto officeआरटीओ ऑफीसcarकारElectric Carइलेक्ट्रिक कार