पगार न दिल्याने सोलापुरात कामगारानेच फोडले दुकान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:10 IST2019-01-16T13:09:04+5:302019-01-16T13:10:02+5:30

सोलापूर : मालकाने पगार दिला नाही म्हणून दुकान फोडून एक लाख रूपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याप्रकरणी कामगाराविरूद्ध सदर बझार ...

The worker, who was robbed in Solapur, did not pay the salary | पगार न दिल्याने सोलापुरात कामगारानेच फोडले दुकान

पगार न दिल्याने सोलापुरात कामगारानेच फोडले दुकान

ठळक मुद्देमौलाली चौकात असिफ बाशा भागिरे (वय ३0, रा. ३२, हाजीमलंग दर्गाजवळ, केशवनगर) यांचे दुकान या प्रकरणी असिफ भागिरे यांनी फिर्याद दिली

सोलापूर : मालकाने पगार दिला नाही म्हणून दुकान फोडून एक लाख रूपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याप्रकरणी कामगाराविरूद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही चोरी ८ जानेवारी रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास झाली. 

मौलाली चौकात असिफ बाशा भागिरे (वय ३0, रा. ३२, हाजीमलंग दर्गाजवळ, केशवनगर) यांचे दुकान आहे. दुकानात रौनक जगदी मग्गु (रा. मार्केट यार्ड, बार्शी) हा इसम कामाला होता. काही दिवसांचा पगार मालकाने दिला नव्हता. हा राग मनात धरून रौनक मग्यु हा ८ जानेवारी रोजी पहाटे दुकानाजवळ आला. त्याने दुकानच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील दोन मोठे साऊंड, जुने चालू स्थितीतील दोन फोनिक कंपनीचे एम्प्लिफायर असे एकूण १ लाख रूपये किमतीचे साहित्य चोरून नेले. या प्रकरणी असिफ भागिरे यांनी फिर्याद दिली आहे. तपास पोलीस नाईक तांबोळी करीत आहेत. 

Web Title: The worker, who was robbed in Solapur, did not pay the salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.