शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Women's Day Special : पोट भरण्यासाठी वृद्ध अनंताम्माला रणरणत्या उन्हात वेचावा लागतोय कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 11:39 AM

काशिनाथ वाघमारे सोलापूर : ६५ वर्षीय वृद्धा़़़ रणरणत्या उन्हात चटके घेत कचरा वेचते़़़ झाडाची थोडीशी सावली मिळाली की घोटभर ...

ठळक मुद्देउतारवयातही कष्टाचे ओझे पेलून जगणारी आम्मा म्हणते, कचरा वेचता वेचता अनेक रोगही जडतात.पतीच्या निधनानंतरही मनावर काही जखमा राहिल्या़ कधी शरीरावरच्या तर कधी मनावरच्या जखमा बºया करत आम्मा जगते आहे.

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : ६५ वर्षीय वृद्धा़़़ रणरणत्या उन्हात चटके घेत कचरा वेचते़़़ झाडाची थोडीशी सावली मिळाली की घोटभर पाणी घेते़.  दिवसभरातले पाच तास फि रून कचरा वेचून दिवसाची गुजराण करणाºया वृद्धेची आशा अजून संपलेली नाही. विधवा मुलीला घेऊन दोघींच्या संसाराचा गाडा हाकते आहे. पतीच्या निधनानंतरही उदरनिर्वाहासाठीचा संघर्ष चालूच आहे़़़ लग्नापूर्वी होता आणि आता पतीच्या निधनानंतरही संघर्ष थांबला नाही. या संघर्षालाच कवटाळून जगणाºया आम्माला जागतिक महिला दिनाची संकल्पनाच कळालेली नाही़  रोजचा दिवस सारखाच वाटतो.

अनंताम्मा अशोक कवडे असे संघर्षवान आम्माचे नाव़ लष्कर परिसरातील सरस्वती चौकात राहणारी अनंताम्मा कधी सकाळी तर कधी दुपारी उठून उकिरड्यावरील प्लास्टिक कचरा वेचून दिवसाची गुजराण करते आहे़ सरकारने अनेक योजना काढल्या, परंतु त्या खºया अर्थाने अशा आम्मापर्यंत कुठे पोहोचल्या? हा प्रश्न निरुत्तर करतो़ ना शिक्षण घेता आले, ना नातेवाईक राहिले़ पती आणि जावयाच्या निधनानंतर एकाकी पडलेली आम्मा एकुलत्या एका मुलीला आपले विश्व मानून जगते आहे.

 दिवसभरात अशोक चौक, अक्कलकोट रोड अशा अनेक परिसरात फिरून कचरा वेचणाºया आम्माला दिवसभरात पाच तास फिरून केवळ ५० रुपये मिळतात़ मिळालेल्या पैशात गुजराण करताना खूप समस्या समोर येतात़ या समस्या घेऊन दिवस काढते़ काही वर्षांपूर्वी मुलीचा विवाह लावून दिला़ तिचा पतीही खूप दिवस राहिला नाही़ या वयात कोणाचाच आधार नसल्याने एकाकी जगणाºया आम्मापर्यंत शासनाची कोणतीच योजना पोहोचली नाही, याचीच खंत ती व्यक्त करते़ 

जखमा घेऊन जगते़...उतारवयातही कष्टाचे ओझे पेलून जगणारी आम्मा म्हणते, कचरा वेचता वेचता अनेक रोगही जडतात. कधी-कधी काचा, खिळे हाता-पायांना लागून जखमा होतात. पतीच्या निधनानंतरही मनावर काही जखमा राहिल्या़ कधी शरीरावरच्या तर कधी मनावरच्या जखमा बºया करत आम्मा जगते आहे़ समाजातून मदतीचा आधार मिळावा, कुणीतरी श्रावणबाळ होऊन पुढे यावे, एवढीच अपेक्षा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला व्यक्त करते आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरWomen's Day Specialजागतिक महिला दिनWomenमहिला