शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

तिने मला 'ग्रीन टी'मधून गुंगीचं औषध दिलं, अन्...; श्रीकांत देशमुख यांना राजकीय कटाची शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 20:02 IST

व्हायरल व्हिडिओत दिसते की, ही महिला सुरुवातीला मोबाईल कॅमेऱ्यासमोर हमसून-हमसून स्वतःचं नाव सांगते

ग्रीन टीमधून गुंगीचे औषध दिले, भाजप नेत्याचा महिलेवरच आरोप

सोलापूर : भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा बेडरुममधील खळबळजनक व्हीडिओ एका महिलेने व्हायरल केला. तसेच गेल्या तीन वर्षांपासून आपण पत्नी म्हणूनच त्यांच्या सोबत राहतोय, अशी तिची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर जोरात फिरली. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठांनी आदेश देताच श्रीकांत देशमुख यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर, घडल्या प्रकाराबद्दल त्यांनी आपली बाजू मीडियासमोर मांडली आहे. संबंधित महिलेने गुंगीचे औषध दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

व्हायरल व्हिडिओत दिसते की, ही महिला सुरुवातीला मोबाईल कॅमेऱ्यासमोर हमसून-हमसून स्वतःचं नाव सांगते. तिच्या गळ्यात मंगळसूत्रही दिसते. नंतर आलिशान बेडरूममधील डबल बेडवर अंतर्वस्त्रावर बसलेल्या श्रीकांत देशमुख यांच्याकडे मोबाईलचा कॅमेरा फिरवत ती म्हणते की, 'हा जो माणूस आहे, नाव श्रीकांत देशमुख आहे. यानं मला फसवलं आहे. हा बायकोबरोबरच संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय. लग्न करतोय हा,'

सुरुवातीला काय चालले आहे, हे न समजल्याने गोंधळलेले देशमुख बेडवरून उठतात. त्या महिलेच्या अंगावर धावून येत मोबाईलवरील व्हिडिओ बंद करण्यासाठी ढकला-ढकली करतात. याचवेळी ती महिला म्हणते, 'नाही. आता तू बघंच... तुला नाही सोडणार. तू माझ्याशी का खोटं बोलला ?'मात्र ती चवताळून बोलत असतानाच कॅमेरा बंद केला जातो. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मंगळवारी व्हायरल झाला. त्यानंतर भाजप पक्षातील वरिष्ठ यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यांनी तत्काळ श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा घेतला. विशेष म्हणजे पक्षाच्या लेटरहेडवरील हा राजीनामाही घाईघाईने सोशल मीडियावर टाकण्यात संबंधित कार्यकर्तेच धडपड करीत होते.

काय म्हणाले श्रीकांत देशमुख !

श्रीकांत देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, या महिलेने ग्रीन टी मध्ये गुंगीचे औषध घालून माझ्याबरोबर आक्षेपजनक व्हीडिओ बनविला. त्यानंतर चारित्र हननाचा प्रयत्न केला. यात राजकीय विरोधकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे, तसेच संबंधित महिलेविरुद्ध मी ओशिवारा अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये हनी ट्रॅपिंग व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

ऑडिओ क्लीपमध्ये लग्नाचा उल्लेख

देशमुख आणि संबंधित महिला यांच्यातील १७ मिनिटांची ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली आहे. मोबाईलवर बोलताना या महिलेने देशमुखांना म्हटले आहे की, बाळासाठी मी तुमच्यावर प्रेम केले. लग्न केले. तीन वर्षे सोबत राहिले. तरीही मलाच बदनाम केले जात आहे. मी आता तुम्हाला सोडणार नाही. फडणवीसांशीही या विषयावर सविस्तर बोलणार आहे. तुम्ही आता आमदार कसे होता, हे पाहते. माझी हाय तुम्हाला लागली आहे.

टॅग्स :BJPभाजपाSolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण