अन् दुसºया मजल्यावर घरात अडकलेल्या महिलेला काढले सुखरूप बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 11:34 IST2020-06-05T11:31:29+5:302020-06-05T11:34:03+5:30
अग्निशामक दलाच्या जवानांने शर्थीचे प्रयत्न; शेळगीमधील टॉवेल कारखान्याला लागली आग

अन् दुसºया मजल्यावर घरात अडकलेल्या महिलेला काढले सुखरूप बाहेर
सोलापूर : येथील शेळगी परिसरात असलेल्या जय लक्ष्मी सोसायटीमधील टॉवेल कारखान्याला आग लागली़ ही घटना गुरूवार ५ जून २०२० रोजी रात्री बाराच्या सुमारास घडली़ यात जिवितहानी झाली नसली तरी टॉवेल कारखान्यांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जय लक्ष्मी सोसायटी शेळगी येथे टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली होती, त्वरित अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या़ ३० गाड्या पाणी मारून पहाटे तीनच्या सुमारास आग विझवण्यात आली. या आगीमध्ये अनुसया बालय्या येमुल (वय ७० वर्ष ) दुसºया मजल्यावर धुरामध्ये आत घरात अडकलेल्या होत्या़ त्यांना अग्निशामक दलातील जवानांनी दुसºया मजल्यावर जाऊन त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. सदर आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.