शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

मांत्रिकाचा निर्जलज्जपणा; गुंगीचे औषध देऊन तो करायचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 1:30 PM

सोलापुरातील धक्कादायक घटना; भाविकांनाही सांगायचा पैशाचा पाऊस पडतो

ठळक मुद्देफीटचा आजार घालवितो, असे म्हणत जादूटोणा करणाºया मांत्रिकाने अल्पवयीन मुलीस गुंगीचे औषध पाजून अत्याचार गुंगीचे औषध पाजून अत्याचार केल्याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुंगीचे औषध हे देवाचे औषध असल्याचे मांत्रिकाने सांगितले होते

सोलापूर : फीटचा आजार घालवितो, असे म्हणत जादूटोणा करणाºया मांत्रिकाने अल्पवयीन मुलीस गुंगीचे औषध पाजून अत्याचार केल्याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंगीचे औषध हे देवाचे औषध असल्याचे मांत्रिकाने सांगितले होते.

 शिवाजी सिद्राम कोल्हे (वय ३७, रा. काळी मशीद, पत्रातालीमजवळ) असे गुन्हा दाखल झालेल्या मांत्रिकाचे नाव आहे. अल्पवयीन मुलीला फीट (झटके) येत होते, तिच्या आई-वडिलांनी वेगवेगळ्या ठिकाणी उपचार केले मात्र आजार बरा होत नव्हता. नातेवाईकाच्या ओळखीने मांत्रिक शिवाजी कोल्हे याला फेब्रुवारी २०१५ मध्ये घरी बोलावण्यात आले होते. शिवाजी कोल्हे याने घरात रिंगण ओढून मांत्रिक विद्या करण्यास सुरुवात केली. मुलीला हळद-कुंकू लावले व त्यानंतर पाण्यात काहीतरी टाकून पिण्यासाठी दिले होते. त्यानंतर तो दोन ते तीन वेळा अशाच पद्धतीने घरी आला आणि तो जादूटोण्याचा प्रयोग करीत डोक्याला काहीतरी घासून निघून जात होता. काही दिवसांनंतर शिवाजी कोल्हे याने अल्पवयीन मुलीला स्वत:च्या काळी मशीद येथील राहत्या घरी एकटीला बोलावून घेतले होते.

घरात हळदी-कुंकवाचे रिंगण आखून पाण्यामध्ये काहीतरी खायला देत असे, त्यानंतर तो मुलीशी अश्लील चाळे करू लागला. हा प्रकार एक ते दीड वर्ष अशाच पद्धतीने सुरू होता. मात्र मुलीला फीट येणे सुरूच होते. मुलीला उपचाराच्या बहाण्याने सतत आपल्या राहत्या घरी बोलावून घेत होता. गुंगीचे औषध देऊन अत्याचार करीत असे. हा प्रकार मुलीने आई-वडिलांना सांगितला. आई-वडिलांनी शिवाजी कोल्हे याला याबाबत जाब विचारला असता त्याने मुलीसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. 

मुलीसोबत तो विडी घरकूल येथे रूम करून राहू लागला. नंतर दिनांक २९ आॅगस्ट २०१९ रोजी पीडित मुलीला मुलगी झाली. मुलीने शिवाजी कोल्हे आल्यावर लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी मुलीचे आई-वडील काळी मशीद येथील राहत्या घरी शिवाजी कोल्हे याच्याकडे गेले, तेव्हा तो तलवार घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेला व जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी मुलीने सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

प्रचाराचा बहाणा; नेले कर्नाटकातील मंत्रालयातआॅगस्ट २०१७ मध्ये शिवाजी कोल्हे याने मुलीला कर्नाटक येथील मंत्रालय या गावामध्ये घेऊन जाऊन उपचार करावे लागतील, असे सांगितले. मुलीला तेथे नेले. त्या ठिकाणी एका खोलीमध्ये हे देवाचे औषध आहे, असे सांगून दुधामध्ये गुंगीचे औषध टाकून देत होता. मुलीला गुंगी आल्यानंतर तो तिच्यावर अत्याचार करीत होता. तीन दिवस सलग हा प्रकार असाच सुरू होता. 

भाविकांना सांगायचा पैशाचा पाऊस पडतोगुन्हा दाखल झालेला मांत्रिक हा भाविकांना फसवत होता, असे समजले आहे. तो रात्रीतून पैशाचा पाऊस पडतो असे सांगून लोकांना गंडवत होता, अशा काही गोष्टी समजल्या आहेत. सध्या तो सोलापुरातून फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

मंदिराचे नाव करून टाळत होता लग्न...

  • - पीडित मुलगी ही सातत्याने मांत्रिक शिवाजी कोल्हे याला लग्नाबाबत विचारणा करीत होती. मात्र तो मला मंदिर बांधायचे आहे, त्यानंतर लग्नाचे बघू असे सांगून टाळाटाळ करीत होता. 
  • - पीडित मुलीला मुलगी झाल्यानंतर मांत्रिक शिवाजी कोल्हे हा मला मुलगा हवा होता मुलगी नाही, असे म्हणत लग्नास नकार देत होता. मुलीच्या आई-वडिलांनी विचारणा केली असता त्यांना तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. 
  • - लहान मुलीच्या भविष्याचा विचार करून पीडित मुलगी शिवाजी कोल्हे याचा सर्व त्रास सहन करत होती. 
  • - ६ सप्टेंबर २०२० रोजी शिवाजी हा विडी घरकूल येथील घरात असताना दोन मित्रांना घेऊन आला. तेही दोन साधुसंत आहेत. ते म्हणतील तसं कर, असं पीडित मुलीला बजावले. मुलीने याला विरोध केला.
टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी