अजित पवार चोरीच्या मालमत्ता परत करणार का? किरीट सोमय्या यांचा शरद पवारांना सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 13:50 IST2021-10-17T13:48:28+5:302021-10-17T13:50:09+5:30
किरीट सोमय्या आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर

अजित पवार चोरीच्या मालमत्ता परत करणार का? किरीट सोमय्या यांचा शरद पवारांना सवाल
सोलापूर : जरंडेश्वर सह अजित पवारांच्या ७० बेनामी मालमत्ता त्यांच्या बहिणीसह मेव्हण्याच्या नावावर आहेत. या चोरीच्या मालमत्ता अजित पवार परत करणार का? ठाकरे सरकारचा रिमोट कंट्रोल असलेल्या शरद पवारांनी याचे उत्तर द्यावे असे आव्हान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी सोलापुरात दिले.
सोमय्या म्हणाले, मी राज्यातील जनतेचा प्रवक्ता आहे. ठाकरे, पवार आणि नवाब मलिक पुरवठादार यांचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहेत. हे लोक माझ्यावर आरोप करत आहेत. पण त्यांनी घोटाळे केले की नाही हेच लोकांना सांगावे. मी त्यांचे घोटाळे उघड करीतच राहील.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँके मध्ये झालेल्या घोटाळ्याची माहिती घेण्यात येईल. या घोटाळ्यांचा पाठपुरावा करण्यात येईल असेही सोमय्या यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.