शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून करणाºया पतीला जन्मठेप; सोलापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:13 PM

सोलापूर : माहेरहून रिक्षा अन् घर घेण्यासाठी पैस न आणल्याने चिडून पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून करणाºया आरोपीस जिल्हा ...

ठळक मुद्देया खटल्यात एकूण ११ साक्षीदार तपासलेमुलीची साक्ष महत्त्वपूर्ण ठरलीजिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी

सोलापूर : माहेरहून रिक्षा अन् घर घेण्यासाठी पैस न आणल्याने चिडून पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून करणाºया आरोपीस जिल्हा न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शुक्रवारी जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. या खटल्यात ११ साक्षीदार तपासले. यात मुलीची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. बाबुराव शिवप्पा कोळी असे आरोपीचे नाव आहे.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, यातील आरोपी बाबुराव शिवप्पा कोळी (वय ३३, रा. कळके वस्ती, कारंबा नाका, सोलापूर) त्याची पत्नी (मयत) महादेवी हिला घटनेपूर्वी दोन-तीन वर्षांपासून रिक्षा व घर घेण्यासाठी मारहाण आणि छळ करीत असे. या प्रकाराबद्दल महादेवीचा भाऊ फिर्यादी अनिल व त्याच्या घरच्या लोकांनी समजावून सांगितले. यावरही त्याच्यात काही फरक पडत नव्हता. त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून भाड्याने घर घेऊन दिले. काही दिवस तो पत्नीशी व्यवस्थित वागला. पुन्हा छळ, मारहाण करण्यास सुरु केले. घटनेच्या दिवशी ३१ आॅक्टोबर २०१७ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास कारंबा नाका, कळके वस्ती येथील घरी महादेवीच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून गंभीर जखमी केले यातच तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मयत महादेवीचा भाऊ अनिल मनोहर कोणे (रा. सम्राट चौक, माने वस्ती, सोलापूर) याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन सहायक पोलीस निरीक्षक चिंताकिंदी यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 

या खटल्यात एकूण ११ साक्षीदार तपासले. यात आरोपीची मुलगी श्रद्धा कोळी व शेजारी बेगम शेख, जुमीवाले, तपास अधिकारी रमेश चिंताकिंदी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. जिल्हा न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी साक्षीदार, पंच, डॉक्टर यांची साक्ष न्यायालयासमोर आलेल्या परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपीला भा. दं. वि. ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय पाच हजार रुपयांचा दंडही सुनावला. या खटल्यात सरकार पक्षाकडून अ‍ॅड. शीतल डोके, मूळ फिर्यादीकडून अ‍ॅड. विनीत गायकवाड तर आरोपीतर्फे अ‍ॅड. एस. आर. गडदे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून दैवशाला मैंदाड यांनी मदत केली.

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसPoliceपोलिस