अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने पत्नीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 09:16 IST2017-08-16T08:23:28+5:302017-08-16T09:16:28+5:30
अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने पत्नीची हत्या
सोलापूर, दि. 16- अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूरमधील वळसंग भागात ही घटना घडली. या महिलेचा पती आणि त्याच्या प्रेयसीने मिळून महिलेची हत्या केली असल्याची माहिती समोर येते आहे. या दोघांनी पीडित महिलेचा गळा दाबून तिची हत्या केली. तसंच या घटनेचे पुरावे नष्ट करण्यासाठी पती आणि त्याच्या प्रेयसीने पोलीस स्टेशनमध्ये पीडित महिला हरविली असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलीस मित्रामुळे प्रकार उघड झाल्याचं समजतं आहे. या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीनंतर त्या महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. पीडित महिलेची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह त्या दोघांनी घरातच पुरल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आलं आहे. पण त्याची प्रेयसी अजूनही फरार असून तिचा शोध सुरू आहे.
12 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक केली जाइल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.