शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

'राष्ट्रवादीने धनंजय मुंडें अन् अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष का केलं नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 12:58 IST

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरून पडळकर हे घोंगडी बैठकांसाठी आज सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली.

ठळक मुद्देओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरून पडळकर हे घोंगडी बैठकांसाठी आज सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली.

सोलापूर - भाजपा नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर टीका करताना दिसून येतात. पडळकर यांनी सोलापूर दौऱ्यातही शरद पवार यांना भावी पंतप्रधान पदासाठी शुभेच्छा म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस हा साडेतीन जिल्ह्यांपुरता पक्ष असल्याची बोचरी टीका केली. तसेच, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही त्यांनी राष्ट्रवादीला टार्गेट केले. 

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरून पडळकर हे घोंगडी बैठकांसाठी आज सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक ओबीसी नेते आहेत. या महाविकास आघाडी सरकारमध्ये ओबीसी नेते असतानाही त्यांना उपमुख्यमंत्रीपद का मिळाले नाही. तसेच धनंजय मुंडे, अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष का केले नाही, असा सवाल गोपीचंद पडळकरांनी विचारला आहे. भाजपमध्ये सर्वाधिक आमदार ओबीसीचे असून सत्ता असतानाही भाजपने अनेक ओबीसी समाजातील नेत्यांना संधी दिल्याचंही ते म्हणाले. 

दरम्यान, रोहित पवार हे पोस्टर बॉय आहेत, अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी निधी देण्याची नुसतीच घोषणा केल्याची आठवण त्यांनी करुन दिली. तसेच, दिल्लीत भाजपाविरोधी पक्षांच्या झालेल्या बैठकीवरही त्यांनी टीका केली.  कोंबड्याला वाटते मी आरवल्याशिवाय उजाडत नाही; अशा कोंबड्यांनी दिल्लीत बैठक घेतली, असेही पडळकर यांनी म्हटलं. 

याचिकाकर्ता काँग्रेस नेता 

राज्यातील ओबीसींचं स्थानिक स्वराज संस्थामधील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही राजकारणात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. राजकीय नेतेमंडळींकडून ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल होत आहे. सत्ताधाऱ्यांकडून केंद्र सरकारवर तर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांनाच यासाठी जबाबदार धरण्यात येत आहे. त्यातच, याचिकाकर्त्यावरही संघाचा कार्यकर्ता असल्याचे आरोप करण्यात आला होता. त्यानंतर, पडळकर यांनी याचिकाकर्ता हा काँग्रेस नेता असल्याचे सांगितले.  

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेDhananjay Mundeधनंजय मुंडे