शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

घटलेले मतदान कोणाला ठरणार मारक ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 11:35 AM

करमाळा विधानसभा मतदारसंघ; यंदाही तिघांमध्ये दिसून आली चुरस

ठळक मुद्देकरमाळा विधानसभा मतदारसंघात करमाळा तालुक्यातील ११८ गावे व माढा तालुक्यातील कुर्डूवाडीसह ३६ गावांचा समावेश३ लाख २ हजार ३३९ एकूण मतदारांपैकी प्रत्यक्षात २ लाख १३ हजार २५६ मतदान झालेमतदानाची टक्केवारी ७०.५४ टक्के आहे. त्यामध्ये पुरुष मतदान १ लाख १६ हजार २९८ तर महिला मतदान ९६ हजार ९५८ इतके आहे

नासीर कबीर 

करमाळा : करमाळाविधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या रश्मी बागल, अपक्ष नारायण पाटील व संजयमामा शिंदे यांच्यातच अटीतटीचा व चुरशीचा सामना झाला. मतदारसंघात समाविष्ट असलेल्या माढा तालुक्यातील कुर्डूवाडीसह ३६ गावांतून कमी मतदान झाल्याने कोणाला किती मताधिक्य मिळणार यातच विजयाचे गणित दडलेलं आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघात करमाळा तालुक्यातील ११८ गावे व माढा तालुक्यातील कुर्डूवाडीसह ३६ गावांचा समावेश आहे. ३ लाख २ हजार ३३९ एकूण मतदारांपैकी प्रत्यक्षात २ लाख १३ हजार २५६ मतदान झाले. मतदानाची टक्केवारी ७०.५४ टक्के आहे. त्यामध्ये पुरुष मतदान १ लाख १६ हजार २९८ तर महिला मतदान ९६ हजार ९५८ इतके आहे. 

२०१९ मधील विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी पाहता ६५ हजार ते ७० हजार मते प्रमुख उमेदवार घेऊ शकतात, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. 

करमाळा विधानसभा निवडणूक निकालावर माढा तालुक्यातील ३६ गावांचा मोठा परिणाम होतो, हे गत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाले होते. गत विधानसभा निवडणुकीत पाटील, बागल व शिंदे अशीच तिरंगी लढत अटीतटीने व चुरशीची झाली होती. नारायण पाटील यांना ६० हजार ६७४, रश्मी बागल यांना ६० हजार ४१७ व संजयमामा शिंदे यांना ५८ हजार  ३७७ मते मिळाली होती. अटीतटीच्या लढतीत नारायण पाटील अवघ्या ३५७ मतांनी विजयी झाले होते. त्यावेळी तिघा उमेदवारांना मिळालेल्या मतांचे     अंतर फारसे नव्हते. आता २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत सुद्धा  तिघा उमेदवारांमधून विजयी  होणारा उमेदवार एक हजार ते  तीन हजार मताधिक्यानेच विजयी होणार, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.

मतदारसंघात गुलमोहरवाडी मतदान केंद्रात सर्वाधिक ९०.६७ टक्के तर केडगाव मतदान केंद्रात सर्वात  कमी २८.६७ टक्के इतके मतदान झाले.

कोण कुणाला ठरणार भारी- तालुक्यातील पश्चिम भागात नारायण पाटील यांना पसंती दिल्याचे मतदारांनी सांगितले. रावगाव, पोथरे गटात नारायण पाटलांविषयी मतदारांनी नाराजी व्यक्त करून रश्मी बागल यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आहे. संजयमामा शिंदे यांनी झेडपी अध्यक्षपदाच्या माध्यमातून केलेली कामे आणि माजी आ. जयवंतराव जगताप यांचा मिळालेला पाठिंबा याचा फायदा दिसून येत आहे. वंचितचे उमेदवार अतुल खुपसे  माढा तालुक्यातील असून, पक्षाकडून निवडणुकीत नशीब अजमावित आहेत. ते किती मतदान घेतात व कोणाचे मतदान खातात यावरही बरेच अवलंबून आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकkarmala-acकरमाळा