VIDEO: कोण रोहित पवार? आमदार प्रणिती शिंदे यांनी उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 13:21 IST2023-02-10T13:16:52+5:302023-02-10T13:21:44+5:30
कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे. त्यांना मॅच्युरिटी यायला वेळ लागेल, अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पवारांची खिल्ली उडवली.

VIDEO: कोण रोहित पवार? आमदार प्रणिती शिंदे यांनी उडवली खिल्ली
राकेश कदम. सोलापूर:
कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे. त्यांना मॅच्युरिटी यायला वेळ लागेल, अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पवारांची खिल्ली उडवली.
VIDEO: कोण रोहित पवार? आमदार प्रणिती शिंदे यांनी उडवली खिल्ली pic.twitter.com/9otOf05Q3g
— Lokmat (@lokmat) February 10, 2023
सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे की राष्ट्रवादीकडे राहील याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत होईल असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नुकतेच सोलापुरात केले होते. यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी रोहित पवार यांच्यावर टीका करीत आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघ मागू असे म्हटले होते. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शहरातील नेत्यांमध्ये शाब्दिक वार सुरू होते. रोहित पवार यांच्या विधानाबाबत आमदार प्रणिती शिंदे यांना पत्रकारांनी शुक्रवारी प्रतिक्रिया विचारली. यावर आमदार प्रणिती शिंदे यांनी कोण रोहित पवार मी ओळखत नाही. त्यांची पहिली टर्म आहे मॅच्युरिटी यायला वेळ लागेल असे उत्तर दिले.