शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

उजनी धरण ओसंडून वाहत असताना सोलापुरात पाणीपुरवठ्याची मात्र बोंबाबोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 12:29 IST

औज, हिप्परगा तलावातही पाणीसाठा; तरीही शहराच्या मध्यवर्ती भागात चार दिवसाआड पाणी

ठळक मुद्देउजनी ते सोलापूर जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती, पंपहाऊसमध्ये बिघाड झाल्यास पाणीपुरवठा विस्कळीतशहरात नळ पुरवठ्यासाठी १२०० किमी लाईन आहे. यातील काही लाईन बंद असूनही त्यात पाणी मुरतेपंपहाऊसमध्ये बिघाड झाल्यास हद्दवाढ भागाच्या पुरवठ्यावर परिणाम

सोलापूर : उजनी धरण १०० टक्के भरले आणि कालव्यांना पाणी सोडले, औज बंधाराही काठोकाठ भरला, हिप्परगा तलावातही पाणी येण्यास सुरुवात झाली तरी शहरात पाण्याची बोंब कायम आहे. काही भागात आजही तीन दिवसाआड तर हद्दवाढ भागात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मनपाची पाणीपुरवठा यंत्रणा कालबाह्य झाल्यामुळेच हे भोग नशिबी आल्याचे अधिकारी सांगत आहेत.

जलसिंचनासोबत सोलापूर शहर आणि इतर नगरपालिकांच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी धरणाची निर्मिती झाली आहे. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास असल्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक सांगत आले. त्यांनाही यात यश आले नाही म्हणून शहरवासीयांनी महापालिकेत सत्तांतर घडवले. भाजपनेही एक दिवसाआड पाण्याचा शब्द दिला होता. स्मार्ट सिटी योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहराच्या मध्यवर्ती भागात दररोज पाणीपुरवठ्याचा शब्द देण्यात आला. 

सध्या शहराच्या मध्यवर्ती भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. उजनी पंपगृह, पाकणी जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा विस्कळीत झाल्यास या भागातही चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. जुळे सोलापुरातील पाण्याच्या टाकीवरुन पूर्व भाग, विजापूर रोड, होटगी रोड या भागातही पाणीपुरवठा होतो. सध्या या टाकीवरुन विविध भागात चार ते पाच दिवसाआड पाणी दिले जात आहे. होटगी रोडवरील शंकर नगर, रेवणसिद्धेश्वर नगर, हत्तुरे वस्ती या भागात रात्री-अपरात्री पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी शनिवारी नागरिकांनी केल्या होत्या.

कोरोनामुळे पाणीपुरवठ्यासह इतर अनेक विषयांकडे लक्ष देता आले नाही. परंतु, काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुखांना एक अहवाल तयार करायला सांगितला होता. हा अहवाल मंगळवारी माझ्याकडे येईल. अधिकाºयांकडून मी सर्व गोष्टी जाणून घेणार आहेत. या अहवालानंतर मात्र मी पाणीपुरवठ्याच्या विषयावर काम सुरू करणार आहे.- पी. शिवशंकर, आयुक्त, मनपा. 

पुरवठ्याचा ताळमेळ 

  • १५५ ते १६० एमएलडी शहराला दररोज पाण्याची आवश्यकता
  • ७० एमएलडी उजनी-सोलापूर जलवाहिनीतून दररोज मिळते
  • ०५ एमएलडी हिप्परगा तलावातून मिळते (उपलब्ध असेल तर)
  • ८० एमएलडी औज बंधाºयातून दररोज मिळते
  • ४५ एमएलडी पाणी गळतीमध्ये जाते
  • १०५ एमएलडी पाणी प्रत्यक्षात उपलब्ध होते

पाणी विस्कळीत होण्याची ही आहेत कारणे

  • - उजनी ते सोलापूर जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती, पंपहाऊसमध्ये बिघाड झाल्यास पाणीपुरवठा विस्कळीत.
  • - टाकळी ते जुळे सोलापूर पाणीपुरवठा लाईन कालबाह्य झाली. कायम गळती. पंपहाऊसमध्ये बिघाड झाल्यास हद्दवाढ भागाच्या पुरवठ्यावर परिणाम
  • - शहरात नळ पुरवठ्यासाठी १२०० किमी लाईन आहे. यातील काही लाईन बंद असूनही त्यात पाणी मुरते. काही लाईनला गळती लागते. हद्दवाढ भागात आमदार आणि नगरसेवकांच्या सल्ल्यानुसार अधिकाºयांनी चुकीच्या पद्धतीने पाईपलाईन टाकल्या आहेत. त्याचा फटकाही अनेकांना बसतोय.
  • - चावीवाल्यांच्या कामावर अनेकदा नियंत्रण राहत नाही. चावीवाले मनमानी पद्धतीने काम करीत असल्याच्या तक्रारी नगरसेवक करतात. 
टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाdroughtदुष्काळ