पाचशे रूपयाची लाच स्वीकारताना सोलापुरातील पोलिस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2022 14:55 IST2022-05-10T14:54:57+5:302022-05-10T14:55:09+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पाचशे रूपयाची लाच स्वीकारताना सोलापुरातील पोलिस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले
सोलापूर : पाचशे रूपयाची लाच स्वीकारताना सोलापूर शहर पोलीस दलातील सदर बझार पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यास सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.
नाना वेशा शिंदे (वय ३७, रा. अरविंद धाम पोलीस लाईन, सोलापूर) असे लाच घेतलेल्या पोलीस नाईकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार याच्याविरूध्द सीआरपीसी १०७ प्रमाणे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तक्रारदार याना सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे २ मे ते १० मे २०२२ या कालावधीमध्ये दैनंदिन हजेरी लावण्यात आली होती. त्यानुसार सदर बझार पोलिस ठाणे येथे हजर राहून हजेरी लावली असल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्याकरिता पोलीस नाईक नाना शिंदे यानी तक्रारदारास ५०० रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारलेे असताना त्यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, उमाकांत महाडिक, पोलीस नाईक पकाले, घुगे, लण्णके यांनी पार पाडली.