Video : आबासाहेब, तुम्हीच निवडणूक लढवा, तेव्हा पायावर डोकं ठेवून रडले होते कार्यकर्ते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 10:54 PM2021-07-30T22:54:28+5:302021-07-30T23:16:15+5:30

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेतलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा गणपतराव देशमुख यांनाच उमेदवारी घेण्याचा आग्रह केला होता. विशेष म्हणजे सभेच्या ठिकाणी शेकापच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर गर्दी करत गणपतराव देशमुख यांच्या पायावरच डोकं ठेवलं.

when the workers were crying with their feet on their heads of ganpatrao deshmukh | Video : आबासाहेब, तुम्हीच निवडणूक लढवा, तेव्हा पायावर डोकं ठेवून रडले होते कार्यकर्ते

Video : आबासाहेब, तुम्हीच निवडणूक लढवा, तेव्हा पायावर डोकं ठेवून रडले होते कार्यकर्ते

Next
ठळक मुद्देसांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेतलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा गणपतराव देशमुख यांनाच उमेदवारी घेण्याचा आग्रह केला आहे. विशेष म्हणजे सभेच्या ठिकाणी शेकापच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर गर्दी करत गणपतराव देशमुख यांच्या पायावरच डोकं

सोलापूर/ मुंबई - सांगोल्याचे माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांनी आज सोलापुरात अखेरचा श्वास घेतला. अखेरच्या श्वासापर्यंत समाजकारण करणाऱ्या आबांनी पक्षनिष्ठेचा पाठ महाराष्ट्राला, देशाला शिकवला. सांगोल्याच्या लाखो जनांना पोरकं करुन आज आबासाहेब निघून गेले. तब्बल 11 वेळा आमदार होण्याचा विक्रमच आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे एकाच पक्षातून त्यांनी आपल्या विचारांशी ठाम राहून विधानसभा गाजवली. गणपतराव देशमुख यांच्या साधेपणाचे अनेक किस्से मीडियात रंगतात. सांगोल्याची जनता या वयोवृद्ध आमदारांवर, लाडक्या नेत्यावर जीवापाड प्रेम करते. सांगोल्यातील एका कार्यक्रमात जनतेचं हे प्रेम दिसून आलं होतं.  

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेतलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा गणपतराव देशमुख यांनाच उमेदवारी घेण्याचा आग्रह केला होता. विशेष म्हणजे सभेच्या ठिकाणी शेकापच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर गर्दी करत गणपतराव देशमुख यांच्या पायावरच डोकं ठेवलं. आबा, काहीही झालं तरी यंदाही तुम्हीच निवडणूक लढवा असं म्हणत कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांनी भावुक केललं हे वातावरण पाहून गणपतरावही गहिवरले होते.

मला शेकापला सांगोल्यात जिवंत ठेवायचं आहे. त्यामुळे, मी ह्यात असेपर्यंत शेकापचाच दुसरा आमदार सांगोल्यातून निवडून आणायचाय, असे गणपत देशमुख यांनी त्यावेळी म्हटले होते. विधानसभा निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो तर आमदार म्हणून निश्चित निवडून येईन, पण माझ्या माघारी शेकापचे भवितव्य काय? भविष्यात शेकापचे तत्त्वज्ञान तालुक्यात टिकले पाहिजे. यासाठी मी ही निवडणूक लढवत नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. पक्षासाठी शेवटपर्यंत काम करणारा कार्यकर्ता म्हणूनच आबासाहेब राजकारणात जगले. 

निवडणूक न लढविण्याची आबासाहेबांची घोषणा ऐकताच कित्येकांना रडू कोसळलं होतं. अनेकांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं होतं. गणपत आबांच्या निधनानंतर आज, तोच दिवस पुन्हा पाहायला मिळणार आहे. कित्येकांना रडू कोसळणार आहे, अनेकजण आबांच्या पायावर डोकंही ठेकवणार आहेत, फरक एवढाच... तेव्हा समजवायला आबासाहेब होते, आज त्यांचीच उणीव पोरकं झालेल्या शेकापच्या कार्यकर्त्यांना, सांगोलाकरांना भासणार आहे.  

Web Title: when the workers were crying with their feet on their heads of ganpatrao deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.