शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या एक रुपया किलोनं कांदा विकताना शेतकऱ्यांना वाटली स्वत:च्या पेशाची लाज

By appasaheb.patil | Updated: November 20, 2018 17:18 IST

क्विंटलला ६०० रूपयांचा मिळाला दर : विक्रीतून मिळणाºया रकमेपेक्षा वाहतूक खर्च अधिक

ठळक मुद्देकांदा दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता हतबलकांद्याला क्विंटलमागे कमीतकमी १०० रुपयांचा दर मिळालासध्या मिळणारा दर कांदा विक्रीसाठी केलेला वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुरता हतबल

अरुण बारसकर / आप्पासाहेब पाटीलसोलापूर : कांद्याची आवक फार मोठ्या प्रमाणावर होत नसतानाही कांदा दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता हतबल झाला आहे. सोलापूर बाजार समितीत सोमवारी कांद्याला क्विंटलमागे कमीतकमी १०० रुपयांचा दर मिळाला.

मागील आठवड्यापासून सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक बºयापैकी होऊ लागली आहे. दररोज ३०० च्या जवळपास ट्रक कांदा विक्रीसाठी येत आहे. चांगल्या कांद्यापैकी काही पोत्यांना( एक-दोन टक्के) एक हजारापेक्षा अधिक परंतु १६०० रुपयांपर्यंत दर मिळतो. मात्र अन्य सर्वच कांद्याला १०० रुपयांपासून दर मिळतो. 

बºयापैकी कांद्याला तीनशे- चारशेच दर मिळतो. सोमवारी बाजार समितीत २७० ट्रक कांदा आला होता. त्याला १०० रुपयांपासून १६०० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे बाजार समिती कांदा विभागाकडून सांगण्यात आले. मात्र विक्रीसाठी आलेल्या कांद्यापैकी काही कांद्यालाच एक हजार रुपयांपेक्षा अधिक दर  व्यापारी देतात असे सांगण्यात आले. सध्या मिळणारा दर कांदा विक्रीसाठी केलेला वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. 

सोमवारी बाजार समितीत वांगी, काटी, जवळगाव, कुंभारी, वळसंग आदी भागातून कांदा विक्रीसाठी आला होता़ कांद्याला कमी प्रमाणात भाव मिळाला आहे़ 

जास्तीचा भाव मिळेल या आशेने आम्ही कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला होता़ मात्र चांगल्या प्रतिच्या कांद्याला सोमवारी फक्त ६०० रूपये भाव मिळाल्याने आम्ही निराश झालो़ मिळालेल्या पैशांतून उत्पादन खर्चदेखील निघाला नाही़ जर असाच भाव मिळाला तर जगायचं कसे असा प्रश्न समोर उपस्थित होत आहे़- चंद्रकांत जवळकोटे, शेतकरी, वांगी.

मी कालच आमच्या शेतातील कांदा कापणी करून सोमवारी विक्रीसाठी सोलापूरच्या बाजार समितीत आणला़ मात्र आवक कमी असताना दर म्हणावा तसा मिळाला नाही़ उलट शेतकºयांची घोर निराशा झाली़ उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकरी नाराज झाला आहे़ शेतकºयांना जास्तीचा भाव मिळावा यासाठी शासनाने प्रयत्न करावेत़- अण्णाप्पा कटारे, शेतकरी, कुंभारी.

मी ५० पाकीट कांदा विक्रीसाठी आणला़ वाहतूक खर्च जास्तीचा जात आहे़ मी आणलेल्या कांद्याला सरासरी ५०० रूपये एवढा दर मिळाला़ कांदा लागवड, कापणी, खुरपणी, औषध फवारणी आदी खर्च धरला तर तो हजारो रूपयांत जातो़ अन् कांद्याला भाव मिळतो तो फक्त शेकडो रूपयांत़ काय करावं काही कळेनासे झाले आहे़ - सयाजी देशमुख, शेतकरी, काटी़

मी मोठ्या आशेने ३५ पाकीट कांदा विक्रीसाठी बाजारात आणला़ मी आणलेल्या १ नंबर कांद्याला ६०० रूपये, ३ नंबर कांद्याला ३०० रूपये दर मिळाला़ मला एक पाकीट कांद्यासाठी साधारणपणे २०० ते ३०० रूपये खर्च आला़ उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळाल्याने कर्जाचा बोजा वाढला़ शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे़ - त्रिंबक कापसे, शेतकरी, जवळगाव. 

टॅग्स :SolapurसोलापूरonionकांदाFarmerशेतकरीagricultureशेती