शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वायफाय अन् हायफायवर काय पोटं भरत नाहीत; आमदार प्रणिती शिंदेंची भाजप सरकारवर आरोप

By appasaheb.patil | Updated: November 20, 2019 14:05 IST

स्मार्ट सिटीच्या कामासह भाजपच्या दोन्ही मंत्र्यांच्या कारभारावर केला हल्लाबोल

ठळक मुद्देसोलापूर शहरातील विविध विकासकामांसाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी आपला प्राधान्यक्रम असणार - आ. प्रणिती शिंदे शहरात दररोज पाणीपुरवठा व्हावा, कामगारांचे प्रश्न सुटावेत, याकडे अधिक लक्ष असणार - आ. प्रणिती शिंदे सोलापुरात आयटी पार्क व्हावं, यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत़ प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मक व महत्त्वाची असते - आ. प्रणिती शिंदे

सोलापूर : सोलापूर शहर हे स्मार्ट सिटी असेल तर हद्दवाढ, झोपडपट्टी अन् पूर्व भागात जावा, काय स्मार्ट सिटी आहे हे समजेल़ फक्त ३ टक्के सोलापुरात स्मार्ट सिटी करता आणि वाहवा़़़ वाहवा करता, ही कोणती पद्धत़ वायफाय आणि हायफायवर काय पोटं भरत नाहीत अन् रस्ते होत नाहीत़ काय फायदा झाला, या स्मार्ट सिटीचा़ साधं शहरातील नागरिकांना नियमित पाणी देऊ शकत नाही अन् म्हणता सोलापूर स्मार्ट सिटी, असा घणाघाती आरोप आ. प्रणिती शिंदे यांनी भाजपवर केला आहे.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात आ़ प्रणिती शिंदे भाजप सरकारच्या कामगिरीवर जोरदार टीका केली.

पुढे बोलताना आ़ प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशात, राज्यात, महापालिकेत भाजपचीच सत्ता असताना त्यांना सोलापूरच्या विकासासाठी साधा निधी आणता आला नाही, ही शोकांतिका आहे़ स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्यात येणारी कामे निकृष्ट पद्धतीची आहेत़ शहरात मागील काही दिवसांपासून फक्त वरवऱ़़ शोबाजीचे काम सुरू आहे़ भाजपचे नगरसेवक तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे भाजपला लोकांचे प्रश्न समजत नाहीत.

सोलापूर शहरातील विविध विकासकामांसाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी आपला प्राधान्यक्रम असणार आहे़ शहरात दररोज पाणीपुरवठा व्हावा, कामगारांचे प्रश्न सुटावेत, याकडे अधिक लक्ष असणार आहे़ सोलापुरात आयटी पार्क व्हावं, यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत़ प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मक व महत्त्वाची असते.

 यंदाची निवडणूकही तशीच होती, पण एक चांगलं झालं की, धर्म, जात, भाषा यापेक्षा लोकांनी माझ्या आजवरच्या कामकाजावर विश्वास ठेवून मला निवडून दिल्याचंही शिंदे म्हणाल्या़ शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत तिसºयांदा कोणीच निवडून आलं नाही़ पण मी मतदारसंघात फिरले होते, माझा जवळपास सर्वांशी संपर्क झाला आणि मला मतदारांतून मिळत असलेला धीरच महत्त्वपूर्ण होता़ त्या आधारावरच मी विजयी होणार हे जाणून होते आणि सर्वांना मी विजयी होणार असा धीर दिला, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

स्मार्ट सिटी योजनेचे काम निकृष्ट़़...- स्मार्ट सिटी योजनेचे काम निकृष्ट पद्धतीचे झाले आहे़ रस्त्यांना आतापासून तडे जात आहेत, अनेक ठिकाणी पाणी साचत आहे़ सर्वच रस्ते खोदून ठेवले आहेत़ कामाचा वेग अजिबात दिसत नाही़ ३ टक्के भागामध्येच काम आणि संपूर्ण शहराची दुरवस्था याला स्मार्ट सिटी म्हणता येईल का, असाही सवाल आ़ प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला़ स्मार्ट सिटी नव्हे तर वाट लावलेली सिटी असं चित्र पुढे येत आहे़ दोन्ही मंत्र्यांनी भांडणाशिवाय काही केलं नाही...- देशात, राज्यात व महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही सोलापुरातील दोन्ही मंत्र्यांना सोलापूरच्या विकासकामांसाठी निधी आणता आला नाही़ दोन्हीही मंत्र्यांनी भांडणाशिवाय काहीही केलं नाही़ भाजप गटातटात विखुरला गेला आह़े पाण्याच्या विषयावर सुद्धा हे नगरसेवक एकत्र येत नाहीत, हे बरोबर नाही़ लोकांना आता कळून चुकलं आहे की आपण चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता दिली आहे़ 

टॅग्स :Solapurसोलापूरcongressकाँग्रेसPraniti Shindeप्रणिती शिंदेBJPभाजपाSubhash Deshmukhसुभाष देशमुखVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख