काय सांगता; मुर्ती बनवणाऱ्या कलाकाराची तिघांनी तोडली हातोड्यानं बरगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 21:37 IST2021-01-09T21:37:08+5:302021-01-09T21:37:54+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

What do you say The sculptor was broken by three people with a hammer | काय सांगता; मुर्ती बनवणाऱ्या कलाकाराची तिघांनी तोडली हातोड्यानं बरगडी

काय सांगता; मुर्ती बनवणाऱ्या कलाकाराची तिघांनी तोडली हातोड्यानं बरगडी

पंढरपूर : मुर्ती बनवणाऱ्या एका कलाकाराची बरगडी हातोड्याने मारुन तोडल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास पंढरपूर शहरातील दाळे गल्ली येथे घडला आहे. यामध्ये जखमी झालेल्या इसमाचे नाव राजेंद्र मच्छिंद्र धोत्रे  (रा. दाळे गल्ली, पंढरपुर) असे आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबादास बाबुराव धोत्रे, अशोक चौगुले, किशोर अशोक चौगुले (सर्व रा. दाळे गल्ली, पंढरपुर) हे संगनमत करून राजेंद्र मच्छिंद्र धोत्रे यांच्या घरासमोर आले.
त्यानंतर त्या तिघांनी राजेंद्र मच्छिंद्र धोत्रे यांना शिवीगाळी करुन हातोड्याने मारुन बरगाडी तोडली आहे. तसेच काठीने डोक्यात देखील मारहाण केली. राजेंद्र  धोत्रे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वरील तिघांनी संगनमत करुन मारहाण केल्याची तक्रार राजेंद्र धोत्रे यांनी पोलिस ठाण्यात केली आहे. पुढील तपास पोहेकॉ. वाघमोडे हे करीत आहेत. 

Web Title: What do you say The sculptor was broken by three people with a hammer