मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमातळावर स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 12:24 IST2018-10-17T12:23:49+5:302018-10-17T12:24:47+5:30

सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौºयावर आले असून सोलापूर विमानतळावर त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री ...

Welcoming the Chief Minister Devendra Fadnavis on Solapur Insurance | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमातळावर स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमातळावर स्वागत

ठळक मुद्देराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौºयावरसोलापूर विमानतळावर त्यांचे उत्स्फूर्त स्वागत

सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौºयावर आले असून सोलापूर विमानतळावर त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री यांच्या समवेत सहकारमंत्री सुभाष देशमुख, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी यांचेही आगमन झाले.

विमानतळावर पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभाताई बनशेट्टी, खासदार शरद बनसोडे, उपमहापौर शशिकला बत्तुल, पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे - पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी मुख्यमंत्री यांचे स्वागत केले. यावेळी मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Welcoming the Chief Minister Devendra Fadnavis on Solapur Insurance