तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे सोलापुरात स्वागत

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: June 26, 2023 17:26 IST2023-06-26T17:25:45+5:302023-06-26T17:26:15+5:30

सोलापूरकरांकडून घोंगडी आणि काठी देऊन त्यांचे स्वागत झाले. हात उंचावून त्यांनी सोलापूरकरांना अभिवादन केले. 

Welcome to Telangana Chief Minister KCR in Solapur | तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे सोलापुरात स्वागत

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे सोलापुरात स्वागत

सोलापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर असून सोमवारी दुपारी चार वाजता त्यांचे सोलापुरात आगमन झाले. बोरामणी नाका जवळील मार्केट यार्डासमोर त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. सोलापूरकरांकडून घोंगडी आणि काठी देऊन त्यांचे स्वागत झाले. हात उंचावून त्यांनी सोलापूरकरांना अभिवादन केले. 

 त्यांच्यासोबत सहाशे गाड्यांचा ताफा आहे. सोमवारी रात्री त्यांचा सोलापुरात मुक्काम असून मंगळवारी सकाळी पंढरपूरच्या दर्शनाला ते रवाना होणार आहेत. त्यानंतर सकाळी भगीरथ भालके यांच्या शेतकरी मेळाव्यास ते हजेरी लावणार आहेत.
 

Web Title: Welcome to Telangana Chief Minister KCR in Solapur