शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

रडवणाºया कांद्याने १२० दिवसात २१ लाखांचे उत्पन्न देऊन हसविलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:23 IST

शेटफळच्या समाधान गुंड तरुण शेतकºयाची यशोगाथा; आधुनिक तंत्रज्ञान अन् योग्य नियोजनाचा झाला फायदा

ठळक मुद्देसमाधान विश्वनाथ गुंड असे त्या तरुण शेतकºयाचे नाववडिलोपार्जित शेतीत अपुºया पाण्यावर घेतलेल्या उत्पन्नाला भावकांदा लावण्यापूर्वी त्यांनी बियाणे शेतात टाकून रोप तयार केले़

मारुती वाघमोडनिंब : ‘मोठ्या प्रमाणात जमीन असून लागवडीचे तंत्र नसेल तर त्या शेती करण्याला काही अर्थ नाही’ हे वाक्य तरुण शेतकºयाला भेडसावत होते़ त्यांनी काही ठिकाणी फिरून आधुनिक पीक लागवड, नियोजन याची माहिती घेतली़ पीक नव्हे तर प्रयोगाच्या माध्यमातून पीक घेण्याचा प्रयत्न केला़ पाण्याचे नियोजन करून शेटफळ येथील एका तरुण कांदा उत्पादकाने अवघ्या तीन एकरात २१ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले.

समाधान विश्वनाथ गुंड असे त्या तरुण शेतकºयाचे नाव असून, त्यांनी शेटफळ (ता़ मोहोळ) येथील शेतात केलेल्या प्रयोगाच्या निरीक्षणासाठी अनेक शेतकरी येताहेत. जेमतेम दहावी शिकलेल्या या तरुणाला नोकरी मिळत नसल्याने पारंपरिक शेतीकडे ओढा निर्माण झाला़ त्यामध्ये यशस्वी प्रयोग केले.

वडिलोपार्जित शेतीत अपुºया पाण्यावर घेतलेल्या उत्पन्नाला भाव कसा मिळेल, हा प्रश्न भेडसावत होता़ असे अनेक प्रश्न समोर असताना महादेव गुंड यांनी साडेतीन एकरात कांदा लावण्याचा निर्णय घेतला़ कांदा लावण्यापूर्वी त्यांनी बियाणे शेतात टाकून रोप तयार केले़ त्यांनी शेतामध्ये चांगल्या पद्धतीची खोलवर नांगरट केली़ त्यात दोन पाळ्या टाकल्या व बोध सोडण्यात आले़ त्यावर ड्रीप अंथरुन संपूर्ण भोद गार करण्यात आले़ त्यानंतर घरीच कांद्याची रोपे तयार केली.

१० सप्टेंबर रोजी महिला मजुरांद्वारे या रोपांची लागवड केली़ त्यानंतर मजुरांमार्फ त एक खुरपणी केली़ तसेच १८:४६ चा पहिला डोस १५ दिवसात दिला़ दुसरा डोस १०:२६ आणि युरिया टाकून पाणी दिले. त्यानंतर त्याची चांगली वाढ व्हावी म्हणून ००५० पोटॅश विद्राव्य खत देण्यात आले़ त्यानंतर थ्रिप्स व करपा बळावू नये म्हणून चार फवारण्या करण्यात आल्या़ कारण कोणत्याही पिकाला हवामान अनुकूल नसल्यामुळे पिके रोगाला बळी पडत होती़ त्यामुळे फवारणी करण्यात आली़ या फवारणीमुळे कांदा अतिशय चांगल्या प्रतीचा मिळाला़ तसेच तो रोगाला बळी पडला नाही.

१२० दिवसांनंतर काढलेला कांदा चिरून वाळविला - १२० दिवसांनंतर कांद्याची काढणी करण्याचा निर्णय घेतला़ १४ डिसेंबर रोजी मजुरांमार्फत कांदा उपटून चिरून तो चांगल्या प्रकारे वाळवले़ नंतर तो पिशव्यांमध्ये भरून मोडनिंब व सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवण्यात आला़ यावेळी टप्प्याटप्प्याने पाठवलेल्या कांद्याला ४,७५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला़ साडेतीन एकर क्षेत्रातून ४५ टन कांदा निघाला़ त्यापासून २१ लाख रुपये मिळाले़ 

दरवर्षी कांद्याची लागवड करतो़ एखाद्या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला तर मागचा-पुढचा सगळा खर्च, तोटा निघतो़ मात्र यंदाच्या वर्षी अतिशय चांगला भाव मिळाल्यामुळे भरघोस उत्पन्न मिळाल़े  तसेच आणखी दोन एकर फुरसुंगी कांदा काढणीस आलेला आहे़ या दोन एकरामध्ये ३० टन कांदा निघण्याची शक्यता आहे़ याला सरासरी दोन हजार रुपये क्विंटल भाव मिळाला तरी आणखी सहा लाख रुपये मिळतील़ पुढील काळात प्रयोशील शेती अवलंबून आपली प्रगती साधावी.- समाधान गुंड,कांदा उत्पादक शेटफळ 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीonionकांदा