शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

आमचे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले; आता जनावरांचं कसं होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 13:25 IST

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या पत्नीचा सवाल 

ठळक मुद्देअनिरूध्द कांबळे यांच्या रूपाने करमाळा तालुक्यातील ते जिल्हा परिषदचे चौथे अध्यक्ष बनलेतब्बल १५ वर्षांनंतर करमाळा तालुक्यास पुन्हा अध्यक्षपदाची संधी मिळालीकेम येथील अनिरूध्द कांबळे हे  सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले

करमाळा : आमचे ‘हे ’ झेडपी अध्यक्ष झाल्यावर गोठ्यातील जनावरांचं कसं होणार? त्यांना  कोण बघणार? असा सवाल सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांच्या पत्नी शुभांगी कांबळे यांनी केमचे माजी सरपंच अजित तळेकर यांच्याकडे केला होता़ जिल्हा परिषद अध्यक्ष आपले पती होणार याची माहिती कळताच त्यांनी चार दिवसांपूर्वीच माझ्याशी अशी चर्चा केल्याची माहिती खुद्द अजित तळेकर यांनी दिली.

राजकारणाची कसलीही पार्श्वभूमी नसलेले सर्वसामान्य कार्यकर्ता व शेतकरी असलेले  केम येथील अनिरूध्द कांबळे हे  सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले आहेत़ अनिरूध्द कांबळे यांचे वडील शेतकरी आहेत. ते गावपातळीवर कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना केमचे माजी सरपंच अजित तळेकर यांनी माजी आ. नारायण पाटील यांना सांगून त्यांना  जिल्हा परिषद गटातून प्रथमच निवडणुकीत उभे करून निवडून आणले़ आता योगायोगाने जिल्हा परिषदचे अध्यक्षपद राखीव झाल्यानंतर त्यांना आता अध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे.

अनिरूध्द कांबळे यांच्या रूपाने करमाळा तालुक्यातील ते जिल्हा परिषदचे चौथे अध्यक्ष बनले आहेत. यापूर्वी  करमाळा तालुक्यातून कै. नामदेवराव जगताप, काकासाहेब निंबाळकर व कै. नारायण खंडागळे यांना संधी मिळाली होती. कै. नारायण खंडागळे २००५ मध्ये अध्यक्ष बनले होते. तब्बल १५ वर्षांनंतर करमाळा तालुक्यास पुन्हा अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.

पाटलांचा डबल धमाका..- माजी आ. नारायण पाटील यांचे समर्थक असलेले जिल्हा परिषद सदस्य अनिरूध्द कांबळे यांची जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी व करमाळा तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदावर गहिनीनाथ ननवरे व उपसभापतीपदावर दत्तात्रय सरडे यांची निवड झाली. एकाच दिवशी जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समितीमध्ये सभापती, उपसभापती पदावर कार्यकर्त्यांची निवड झाली़ या राजकीय घडामोडींमुळे नारायण पाटील गटाला डबल धमाका मिळाल्याची तालुक्यात चर्चा आहे़ त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जेऊर, केम, देवळाली येथे गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदPoliticsराजकारण